काश्मीर विलीनीकरणात श्री गोळवलकर गुरूजींचा सिंहाचा वाटा.

0

काश्मीर विलीनीकरणात श्री गोळवलकर गुरूजींचा सिंहाचा वाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशा साठी काय केले? किंवा संघ देशा साठी काय करतो?  संघाचे स्वयंसेवक तिरंगा ध्वजाचा सन्मान करीत नाहीत असे अनेक प्रश्न देशातील संघ विरोधी विचारधारेचे अज्ञानी सेक्युलर पोंगापंडीत किंवा विचारजंत नेहमी करीत असतात.स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून देशात घर घर तिरंगा यात्रा सुरू आहे.संघाचे स्वयंसेवक तिरंगा ध्वजाला मानत नाही असा खोटा प्रचार करून आता तिरंगा यात्रेला सुद्धा लक्ष केलं जात आहे.प्रसार माध्यमात भाजपा ची मातृसंस्था असलेल्या संघटनेनेचे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तिरंगा ध्वजाला मनात नाही असे वक्तव्य करून आपल्या अकलेचे अज्ञान पाजळतात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी करतात आणि हा त्यांचा आता नेहमीचा धंदाच झालेला आहे. देशात भाजपा ची तिरंगा यात्रा सुरू आहे आणि तिरंगा यात्रेला अनुसरून सेक्युलर पोंगापंडीत उपरोक्त उल्लेखित प्रश्न उपस्थित करून टिंगलटवाळीवाला प्रचार करीत आहेत.टिंगलटवाळी जरी भाजपची असली तरी मात्र त्यांच लक्ष भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असतो.वास्तविक पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वंयसेवकांनी चले जाव चळवळीत तिरंगा ध्वजाच्या सन्मान केलेला आहे बिहार मधील ब्रिटिश सचिवालय पासून रामटेक ब्रिटिश कचेरीवर तिरंगा ध्वज फडकविण्यात संघ स्वयंसेवक आघाडीवर होते.श्रीनगर च्या लाल चौकात तिरंगा ध्वजाचा सन्मान करणारे संघाचे स्वयंसेवक मुरली मनोहर जोशी व नरेंद्र मोदी होते. जेथे झेड प्लस सुरक्षा मध्ये सुशील कुमार शिंदे यांना भीती वाटत होती तेथे विना सुरक्षा मुरली मनोहर जोशी व नरेंद्र मोदी तिरंगा ध्वजाचा सन्मान करण्या साठी गेले होते.संघाच्या स्वयंसेकांनी नेहमीच प्रथम राष्ट्रहित जोपासले असून संघाच्या स्वयंसेवकांनी सुद्धा राष्ट्र प्रथम आणि राष्ट्रसेवा हे जीवनमुल्य अंगीकारलेले आहे देशातील कोणत्याही आपदाच्या कठीण काळात संघाचे स्वयंसेवक प्रथम उभे राहतात हा इतिहास आहे.त्यामुळे देशाहिता साठी संघर्ष करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष का केले जाते? संघ इतिहासाची उजळणी व्हावी म्हणूनच हा लेख प्रपंच आहे. देश स्वातंत्र झाल्या नंतर फाळणीच्या भयंकर वेदना तथा देशातील 540 संस्थान विलीनीकरण करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.सरदार पटेल यांच्या कणखर नेतृत्वाखाली 538 संस्थाने भारतात सामील झाले होते परंतु देशाचे अविभाज्य घटक काश्मीर आणि हैदराबादच्या प्रश्न किचकट बनला होता.सरदार पटेल यांनी योग्य कार्यवाही करून हैदराबादचा प्रश्न मिटवून निजाम स्टेटचे भारतात विलीनीकरण करून घेतले होते.परंतु जम्मू काश्मीरचा प्रश्न प्रलंबित होता. तेव्हा सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांच्या सोबत संपर्क साधून काश्मीर विलीनीकरण संबंधी राजा हरिसिंह यांच्या सोबत संपर्क करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.श्री गोळवलकर गुरुजी यांनी काश्मीरचा दौरा केला आणि त्यांच्या पुढाकाराने जम्मू व काश्मीर संस्थान भारतामध्ये सामिल झालेले होते.जम्मू आणि काश्मीरच्या भारतात विलीनीकरण इतिहास मध्ये तथा कश्मीर भारतात सामील करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वपूर्ण भूमिका असून श्री गोळवलकर गुरुजी यांचा सिंहाचा वाटा राहीलेला आहे. हिंदुस्तान फाळणीच शल्य घेऊन स्वातंत्र झाला होता व निर्माण झालेल्या पाकिस्तानने काश्मीरची भूमि गिळंकृत करण्याचा मनसुबा करून तेथे कुरापती सुरु केल्या आणि आपल्या पाकिस्तानी फौजा कश्मीर मध्ये घुसविण्याची तयारी सुद्धा केली होती कश्मीरचे महाराजा राजा हरीसिंह यांनी हिंदुस्तान अथवा पाकिस्तान मध्ये सामील न होण्याची तठस्थ भूमिका घेतली होती व यांच संधिचा फायदा घेत पाकिस्तान घुसखोरीच्या तयारीला लागला होता ही बाब भारत सरकारच्या लक्षात सुद्धा येत होती राजा हरीसिंह यांच्या भारतात सामील न होता तठस्थ राहण्याच्या भूमिके मुळे भारत सरकार सुद्धा चिंतित होते त्याच दरम्यान ऑक्टोम्बर 1947 च्या पहिल्या आठवडया मध्ये पाकिस्तानी फौजानी घुसखोरीच्या हालचाली प्रारंभ केल्या.हल्ला होऊ शकतो याची कल्पना सुधा भारत सरकारला आली होती तेव्हा भारत सरकारच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांनी गोळवलकर गुरुजी यांच्या सोबत संपर्क करण्यात आला संभावित धोक्यावर पटेल व श्री गुरुजी यांच्या मध्ये संवाद झाला.श्री गोळवलकर गुरुजी यांनी राजा हरिसिंह यांची भेट घेण्याची योजना झाली.त्यानुसार श्री गोळवलकर गुरूजी दि.17 ऑक्टोम्बर 1947 रोजी सरकारी विमानाने श्रीनगरला पोहचले त्यांच्या सोबत प्रचारक वसंतराव ओक व वकील नरेंद्रसिंह उपस्थित होते.दि.18 ऑक्टोम्बर रोजी कर्णमहाल मध्ये पोहचले तेव्हा स्व:ता राजा हरीसिंह व त्यांच्या पत्नि महाराणी तारा राणी यांनी राजवाडया प्रवेशद्वार उभे राहून श्री गोळवलकर गुरुजी यांचे स्वागत केले त्याच दिवशी राजा हरीसिंह व श्री गुरुजी यांच्या मध्ये संभावित धोके व जम्मू आणि कश्मीर हिंदुस्तान मध्ये विलीनीकरण संबधी प्रदीर्घ चर्चा झाली मी आपल्या सुचनावर अवश्य विचार करेन ,असा शब्द राजा हरीसिंह यांनी श्री गुरुजी यांना दिला व श्री गुरुजी पुढील प्रवासा साठी निघाले दि.23 ऑक्टोम्बर रोजी म्हणजे श्री गुरुजी यांच्या प्रवासा नंतर 5 दिवसांनी पाकिस्तानच्या फौजा जम्मू आणि कश्मीर मध्ये घुसल्या आणि त्यांनी अत्यचाराचा उच्छाद मांडला कश्मीर मधील मौक्याचे ठिकाणवर कब्जा करण्याच्या तयारीला लागले होते रक्तपात सुध्दा घडवून आणला.तेव्हा दि.27 ऑक्टोम्बर 1947 रोजी जम्मू कश्मीरचे प्रधान मेहेरचंद महाजन यांच्या समक्ष महाराज हरीसिंह यांनी विलीनीकरणाच्या पत्रावर स्वाक्षरी करून जम्मू कश्मीर भारत सरकार मध्ये सामील झाल्याचे जाहीर केले शेवटी राजा हरीसिंह व श्री गोळवलकर गुरुजी यांची भेट व झालेल्या चर्चा मधूनच जम्मू आणि कश्मीर भारतात विलीनीकरणाच्या बाजूने निर्णायक ठरली देशाचा मुकुटमणी असलेला कश्मीर भारता मध्ये विलीन होऊन भारताचा अविभाज्य घटक ठरला. काश्मीर चे महाराजा हरीसिंह यांनी जम्मू आणि काश्मीर भारतात अधिकृत विलीनीकरणच्या नंतर भारत सरकार ने हिंदुस्तानी फौजा कश्मीर मध्ये पाठविण्यात सुरुवात केली पण तेथे प्रचंड नैसर्गिक अडथळे निर्माण झाले होते तेव्हा सुद्धा संघाच्या स्वयंसेवनी दुर्गम भागात विमानाच्या धावपट्टया तयार करण्यापासून सैन्याला शस्रसाठा पोहचविण्या साठी हिंदुस्थान फौजाच्या खांद्याला खांद्या लावून काम केले आहे.पाकिस्तानने लादलेल्या युद्धात अनेक स्वयंसेवकाना वीर मरण सुद्धा आलेले आहे अखेर पाकिस्तान पराभूत होऊन हिंदुस्तान दि १ जानेवारी १९४८ रोजी विजयी ठरला त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांचा जम्मु व कश्मीर प्रदेश हिंदुस्तान मध्ये सामील करण्यात सिंहाचा वाटा आहे.तसेच पाकिस्तानने निर्माण केलेल्या युद्धजन्य परीस्थितीत सैन्याच्या खांद्याला खांदा लावुन संघाचे स्वयंसेवक काश्मीर मध्ये झाले उभे झाले होते. हा कपोलकल्पित खोटा इतिहास नसून सत्य घडलेला इतिहास आहे सरकार दरबारी त्याचे पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत.घर घर तिरंगा यात्रा निमित्ताने संघाने देशासाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या साठी काश्मीर विलीनीकरणाचा इतिहास योग्य समज देईल तसेच तरूण मंडळी समोर संघ स्वयंसेवकाचा इतिहास यावा म्हणूनच हा लेख प्रपंच आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.