सन्मान स्त्री चा उत्सव नवरात्रीचा.

0

सन्मान स्त्री चा उत्सव नवरात्रीचा.

“शारदा होसी कधी,कधी तू लक्ष्मी होसी
कधी रागिणी होसी तू,कर्तृत्व तुझे क्षितिजासम
भाग्य लाभले जन्म घेण्या स्त्री कुशीत
घडले छत्रपती माँ जिजाऊ च्या संस्कारात 
आजही उभे रक्षणार्थ पुत्र आई भारतीच्या, जगतजननीच्या”
नवरात्री म्हणजे काय तर नवरात्रीच्या नऊ दिवसाला देवीच्या विविध नऊ रूपांचा जागर,अर्थातच “स्त्री” शक्तीचा जागर,आपली मोलाची कर्तव्य बजावणारी स्त्री शक्ती,मातृत्वाचा ओझर म्हणजे “स्त्री” जिच्या कर्तृत्वार संपूर्ण कार्य अवलंबून असते. परिवाराचा संपूर्ण भार सांभाळणारी स्त्री,विना मोबदला आपल्यासाठी काम करीत असते.एवढेच नव्हे तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वक्षेत्रात काम करणारी स्त्री शक्ती आपण पाहतच आहोत. सर्व आव्हान स्वीकारण्यास स्त्री शक्ती सदैव तत्पर असते, कोरोनाकाळात डॉक्टर,नर्स,स्वच्छता कर्मचारी या सर्व स्त्री शक्तीने देश सावरण्यात मोलाचे योगदान दिले आहे हे विसरता कामा नये.नवरात्रात आनंदात रमणारी स्त्री गरबा,भजन, विविध करमणूकीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवते.या निमित्ताने थोडा विसावा ती घेते.नवरात्रीचे उपवास,शक्तीपीठ दर्शन इत्यादी नियोजित असते.
डॉ. आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या.31 मार्च १८६५ मध्ये त्यांचा जन्म झाला.भारतातील पहिली महिला वैद्यकिय पदवी त्यांनी मिळवली अश्या अनेक कर्तृत्ववान स्त्री शक्ती भारतात होऊन गेल्या हे सगळ्या माँ जगदंबेचेच रूप.
सावित्री बाई फुले ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेले अथक परिश्रम हे सुद्धा दुर्गच रूप आहे.
“खूब लढी मर्दानी झासी वाली राणी”,राष्ट्रावर आलेलं संकट फेटाळून लावण्यासाठी साठी आपल्या मुलाला पाठीवर बांधून युद्धात उतरली तीच नाव लक्ष्मीबाई पण अवतार कालीचा. हिरकणी गौळण रायगडावर दूध पोहचण्यासाठी गेलेली पण गडाचे दरवाजे बंद झाल्याने लेकराच्या प्रेमापोटी उंच व भयावह बुरुज उतरून आली पाळण्यातील बाळासाठी. आईप्रेम स्त्री शक्तीच उदाहरण. या प्रेरक हिंमती साठी छत्रपती शिवबानी हिरकणीचा यथोचित सत्कार केला व त्या बुरुजाला हिरकणी बुरुज हे नाव प्रधान केले
“स्त्री” प्रति आपला आदर कसा असावा हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायला हवे.शत्रूच्या घरातील मुस्लिम स्त्री ला सुद्धा सन्मानपूर्वक त्यांचे घरी पोहचवणे हे फक्त शिवाजी महाराजांच करू शकतात,त्यावेळी राज्याच्या दरबारात स्त्री नृत्य प्रसिद्ध होते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभ्या आयुष्यात दरबारात स्त्री नृत्य कधीच झाले नाही,स्त्री कधीच नाचली नाही.एवढा आदर छत्रपती शिवाजी महाराजांना. माँ जिजाऊ कडून संस्कार मिळाले.हेच छत्रपतींचे संस्कार आपण सुद्धा अंगिकरायला हवे.’पर स्त्री मातेसमान’हे छत्रपतींचे ब्रीद आपण स्वीकारणे गरजेचे आहे,असे झाल्यास महिला अपहरण,स्त्री द्वेष,बलात्कार या बाबी संपण्यास वेळ लागणार नाही.
लेडीज फर्स्ट ही संकल्पना त्या काळातही होती म्हणूनच काही ख्यातनाम शिक्षिका त्यावेळी घडल्या त्यापैकी खलील दोन,गार्गी व विद्युतमा.
शिक्षिका गार्गी हे नाव आपल्या कानी जास्त पडलेच नाही, पण ऐकून आश्चर्य वाटेल की शिक्षिका गार्गी ह्या भारतातील प्रथम शिक्षिका होत्या.गार्गी वाचकन्वी यांचा जन्म 700 ईसा पूर्व झाला शिक्षिका गार्गी ह्या वेदिक साहित्यिक प्रसिद्ध व्याख्याता होत्या ब्रह्मविद्याचे सविस्तर ज्ञान त्यांना होते. शिक्षिका गार्गी ह्या वचन्कु यांच्या कन्या होत्या. गृहदारण्यक उपनिषद मधील सहाव्या व आठव्या ब्राह्मणांमध्ये त्यांचे नाव प्रमुख होते. वेद सूक्त संकलनामध्ये शिक्षिका गार्गी सोबतच मैत्रीता, ग्रहिता यांचे सुद्धा मोलाचे योगदान होते. जगातील सर्वात शास्त्रार्थ याज्ञवल्क्य या महान विभूतीला शिक्षिका गार्गी यांनी त्यांच्या ओतप्रोत् ज्ञानाने पराभूत केले. शिक्षिका गार्गी संस्कृत विदुषी(विद्वान स्त्रीलिंग) व आध्यात्म शास्त्रावर प्रभुत्व असलेल्या जागतिक दार्शनीका होत्या.
विद्युतमा ह्या शिक्षिका गार्गी यांच्या अंदाजे 200 वर्ष नंतरच्या होत्या त्या अतिशय विदुषी होत्या. या कवी कालिदासाच्या पत्नी होत्या कालिदास खूप विद्वान आहे असा असा चेहरा दाखवून विद्युतमा यांचा विवाह कालिदासांची करून दिल्या गेला पण वास्तविकता कवी कालिदास विद्वत्तेत परिपूर्ण नव्हते म्हणून विद्युतमा यांनी कवी कालिदासांना बारा वर्ष गुरुकुलात शिक्षण घेण्यास पाठवले व त्यांना विद्वान घडवले कवी कालिदासांचे गुरु ह्या त्यांच्या पत्नी विद्युतमा होत्या विद्युतमा यांचे रघुवंशम व वेगदुतम हे ग्रंथ आढळतात. मग ते राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, किंवा आर्थिक क्षेत्र असो, स्त्री ही तिची मूलभूत कार्य पार पाडते अन्यायाविरुद्ध लढणारी “महिला वकील”, स्वच्छता कर्मी बनून या भारत स्वच्छ करणारे “महिला कर्मचारी”,” शिक्षिका” बनवून विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांना ज्ञानाची वाट प्रदान करणारी शिक्षिका, तर कधी “सैनिकी” सेवा देणारी मातृशक्ती. या विविध कार्यात आपला मोलाचा वाटा देणारी स्त्री ही”दुर्गाच”असते विविध रुपात जनसेवा करणे ही, स्त्री शक्तीचा जागर आहेच,
“कुकर्मी कृत्य संपायला हवे सगळे सर्वत्र न्याय शोभे
सन्मान असावा याच भूमीवर तिला सर्वत्र शांती लाभे”
“हे देवी या जगात असाही साक्षात्कार व्हायला हवा
 जीवनात भयावह बलात्कार शब्दच नसायला हवा”
अशे भारतातील विविध स्त्री शक्तीचे रूप प्रेरणादायी आहे.म्हणून सन्मान स्त्रीचा हाच उत्सव नवरात्रीचा..

 

हितेश अनिलजी श्रृंगारे
९९६७१६४९६२
Leave A Reply

Your email address will not be published.