बळी.
- बळी म्हणजे केवळ चक्रवर्ती सम्राट नव्हे, तर त्रैलोक्यावर अधिराज्य गाजवलेला आणि प्रजेने काळजात चिरकाळ जपून ठेवलेला चिरंजीवी राजा ! न्याय, प्रेम आणि समृध्दीने त्रैलोक्य उजळून टाकणारा दानवीर, महाबली बळी नेमका कोण होता ? दानशीलतेचं सर्वोच्च शिखर गाठणारा बळी नेमका कसा होता ? जिथे युद्धात त्याचा पराक्रम विजेसारखा झळाळत होता… सभेत त्याचा विचार समुद्रासारखा खोल होता… आणि प्रजेवरचं प्रेम वसंतासारखं बहरलेलं होतं… परंतू त्याच्या ह्या भव्यतेच्या आड दडले होते… संघर्ष, विश्वासघात आणि नियतीचे खेळ. बळीचं हृदय जितकं विशाल होतं, तितकंच हळवं होतं. प्रेम, मैत्री, नातेसंबंध ह्यांच्यात संतुलन राखणारा हा राजा शेवटी कोणत्या निर्णायक क्षणी नियतीसमोर नतमस्तक झाला ? आपण आजही म्हणतो, ईडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे ! ते बळीचं राज्य नेमकं कसं होतं ? त्या बळीच्या राज्याच्या अद्वितीय काळाचं जिवंत दर्शन ह्या कादंबरीतून सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. ही केवळ एका राजाची कथा नाही, तर प्रजेच्या काळजाला स्पर्शून जाणारी, सत्याच्या आसनावर बसलेल्या…धर्म, न्याय, दया आणि अपरंपार दानशीलतेच्या सुवर्णयुगाची उज्वल साक्ष आहे ! ही आहे पराक्रमाच्या गजरात, प्रेमाच्या गंधात आणि त्यागाच्या तेजात न्हालेली त्रैलोक्याची अखंड स्मृती ! ही आहे…ज्याच्या हृदयात प्रजेचा प्रत्येक श्वास सुरक्षित होता अशा महान चिरंजीवी राजाची महागाथा !
- कादंबरी – बळी प्रकाशक – मधुश्री पब्लिकेशन पुणे.
- लेखिका – अंजली दासखेडकर.
- किंमत – 350.
- WhatsApp – 8421188872
- Website – www.madhushreepublication.com