जन्माष्टमी –
प्रत्येकाच्या जन्मानंतरच जीवनाला महत्त्व येतांना सृष्टीची व्यापकता , सामाजिक , राजकीय आणि सांस्कृतिक संस्कारांची परिणामकारकता यांचा मुलाधार ‘ जन्म ‘आहे.भारतीय संत मंडळींनी या जन्माचे आकलन त्यांच्या अनुभवजन्य वाङमयात केलेले आहे.
जन्माचे ते मूळ पाहिले शोधून|
दुःखाचे कारण जन्म घ्यावा ||
संत तुकाराम महाराज
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले | तेंव्हा या विठ्ठले कृपा केली|| संत नामदेव महाराज
जेणे न ये जन्मा यमाची यातना |
ऐसिया साधना करा काही ||
संत एकनाथ महाराज
बहुत जनम का भुला भटका |
लगवाले प्रभू चरण साहारे ||
संत तुकडोजी महाराज
कालगणना जन्माशी निगडीत आहे. भगवान श्रीकृष्ण श्रावण अष्टमीला बुधवारी जन्माला आले तेंव्हा पासून श्रीकृष्ण जन्माष्टमी भारत वर्षात भक्तिभाव आणि आनंदाने साजरी केली जाते.’ अष्टमीला ‘ विषेश महत्त्व असल्याचे कारण म्हणजे या दिवशी ब्रम्हांडातील सर्व सकारात्मक उर्जा शक्ती क्रियाशील असते आणि याचे दुसरे उदाहरण ‘ दुर्गाष्टमी ‘ ! आसुरी शक्तींचा बिमोड करून विजय संपादन करण्याचा मंगल पर्व ! बंदीवासातील देवकीच्या पोटी जन्मलेला आठवा अवतार यमूनेच्या महापुरातून मार्ग क्रमित करत यशोदेच्या महालात पोहचला . ‘ दावा नयनी यशोदेचा सुकुमार ‘ हि आर्तता आणि ‘ हले हा नंदाघरी पाळणा ‘ आजही गायिले जाणारे बारस्याचे गाणे यातिल आर्जव हा जन्माष्टमी चे महत्व सांगणारा आहे. या भारत वर्षीत माजलेल्या असूरी शक्तींचा समूळ उच्चाटन करून ‘ भगवद्गीतेत ‘ मी पुन्हा येणार म्हणून वचन देणारा पुरूषोत्तम !
या अविकारी जन्माला जाणणारा तो ‘ परममुक्त ‘एवढे प्रकांड पांडित्य म्हणजे भगवान ” श्रीकृष्ण “
‘ यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवाती भारत |
अभ्युथानामधर्मस्य तदात्मानं
सृजामहाम् || अ४/७
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ती तत्वत: |
त्यक्तावा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोsर्जून || अ.४ /९
भगवान श्रीकृष्ण द्वारकाधिश होण्यापूर्वी मथुरा , वृंदावन,हस्तिनापूर या मध्यभारतात असतांना त्यांनी केलेले शोर्य , साहस आणि धैर्य अतुलनीय आहे. बालपणातील बाळगोपाळा सोबत आणि गौळणीसोबत केलेल्या क्रिडा ,गोधन सेवा ,बासरीचे मंजूळ घुमणारे सुर…..
मुरलीधर, गिरीधर , चक्रधर ,शारंगधर ,कमलाकर या नामावलित शोभून दिसतांना शस्त्र आणि शास्त्राचा विराट रूप आणि त्याचेच सुक्ष्म दर्शन म्हणजे मृतिकेचा ” कान्होबा ”
रूक्मिणी आणि राधेसह !
भगवंताच्या या आगमनाचे उत्तर भगवद्गीतेतील १२ व्या अध्यायात ( दुर्गयोग ) योगसाधना कष्टप्रद असल्याने “नामसंकीर्तन” हा सोपा मार्ग दाखवला आहे.
ज्ञानेश्वर महाराज यांनी ” हरीपाठात “समजावून देतांना म्हणतात…
हरीवंश पुराण हरीनाम संकिर्तन
हरीविण सौजन्य नेणे काही ||
त्या नरा लाधले , वैकुंठ भेटले
सकळही घडले तिर्थाटन || …
तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार
सागरात |
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशित चे स्वाम्||अ.१२/७
भवसिंधुचेनिमाजे | कवणासी धाकु निपजे | तेथे जरी की माझे | बिहती हन ||८८
म्हणौनि गा पांडवा | मुर्तीचा मेळावा | करौनी त्यांचिया गावा |
धावतू आलो ||८९
या सगुण भक्तीच्या अनन्यतेमुळेच भगवंत अशा भक्तांचा पाठीराखा आहे!
म्हणौनि गा भक्ता | नाही एकही चिंता | तयाने समुद्धर्ता |
आथि मी सदा ||९४
भगवंताच्या या अन्यन्य श्रद्धा भक्तीमुळे जन्माष्टमी ला पाळणा ,फुलोरा ,दुर्वादळ ( बहुळा ) अशी आऱ्हास हि सनातन संस्कृतीची जोपासना आणि गोपाळकाल्यातील भक्तीभाव आणि बंधुभाव शहरांपेक्षा ग्रामिण भागात अधिक आहे.भगवान श्रीकृष्ण यांनी बालपणी शिक्यात ठेवलेली हांडीतील दही आपल्या पेंध्या सुदामा सवंगड्यासोबत खाल्ली होती ! जीवघेण्या थरावर थर गोविंदा चढवून नाही . आजकाल अशी दहीहांडी फोडून दही पायदळी तुडविल्या जाते याला गोपाळकाला म्हणायचा का? बिना संकीर्तनाने ? नट्यांच्या नाचगायणाने गौळण होत नसते .संतांनी काल्याची संहिता ठरविली आहे त्याचे पालन व्हावे.कारण गोपाळ कृष्णाने यमुनेच्या तीरावर जो गोपाळकाला केला तोच चंद्रभागा तिरावर आजही वारकरी संप्रदाय करतो !
चला बाई पांडुरंगे पाहु वाळवंटी |
मांडीयला काला भोवती गोपाळांची दाटी ||…चला बाई..
- वि.ल.उईके ८२७५५२८०१६