Moropant Pingley: The Architect of Hindu Resurgence

मोरोपंत पिंगळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शीर्षस्थ नेत्यांपैकी एक होते आणि संघाचे प्रचारक होते. श्रीराम जन्मभूमी आंदोलनाने भारताचे राजकीय आणि सामाजिक चित्र आमूलाग्र बदलवून टाकले. या आंदोलनाचे बीज रोवणारे, त्याचे नियोजन करणारे आणि पडद्यामागे राहून देशभर अंमलबजावणी करवून आणणारे मोरोपंत पिंगळेच होते. सरस्वती नदीच्या पुनरुज्जीवनाचा त्यांनी ध्यास घेतला होता आणि त्या प्रकल्पाची पायाभरणी त्यांनीच केली. नागपूरजवळील देवालापार येथील गो अनुसंधान केंद्र, अखिल भारतीय इतिहास संकलन समिती, महाराष्ट्रातील आणि देशातील असंख्य सेवा प्रकल्प, सहकारी संस्था सुरू करण्यामागे त्यांची प्रेरणा आणि कष्ट होते. देशातील आणीबाणी विरुद्ध संघपरिवाराने निकराचा लढा दिला. भूमिगत राहून त्या आंदोलनाचे समन्वयन करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये मोरोपंतांच्या समावेश होता.
मोरोपंत पिंगळे यांच्या या विविध कार्याचा आलेख Moropant Pingley: The Architect of Hindu Resurgence या पुस्तकात विस्तृत पद्धतीने मांडला आहे. या शिवाय, त्यांचे कार्यकर्त्यांना जोडून ठेवणे, सहज वागण्याची पद्धती, त्यांचा जिव्हाळा, हाती घेतलेल्या कार्याबद्दलची तळमळ, मोरोपंतांच्या अनुषंगाने संघाची कार्यपद्धती, प्रचारक पद्धती या सगळ्यांचा विस्तृत पट या पुस्तकात उलगडण्यात आला आहे.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते या पुस्तकाचे नागपुरात ९ जुलै रोजी प्रकाशन झाले.

Moropant Pingley: The Architect of Hindu Resurgence
लेखक: मंदार मोरोणे आणि डॉ. प्रांजली काणे
प्रकाशक: विवेक प्रकाशन, मुंबई.

ABVPBookRammandir AandolanRSSVHP
Comments (0)
Add Comment