रण धोरण उत्क्रांती आणि ऑपरेशन सिंदूर.

रण धोरण उत्क्रांती आणि ऑपरेशन सिंदूर.

०६/०७ मे,२५च्या रात्री,सीमापारहून झालेल्या आतंकी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतानी आपल्या हद्दीत राहून, पाकिस्तानच्या आत हल्ला केला.मात्र यावेळी युद्धबंदी होता,”स्टॉप फायर अग्रिमेंटझाल. पण ही,२०१९ मधल्या भारत पाक संघर्षाची केवळ पुनरावृत्ती नव्हती तर, यामधून भारताच्या आतंकविरोधी  लष्करी रणनीतीमधे झालेला लक्षणीय बदल उजागर झाला ज्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात.२२ एप्रिल, २५ला,पहलगामला झालेल्या आतंकी नरसंहारामुळे भारतात प्रक्षोभक वातावरण निर्माण झाल कारण त्या संहारात,विशेषतः हिंदू पुरूषांना लक्ष्य करून,पॉईंट ब्लँक रेंजवर गोळ्या घालण्यात आल्या. त्याच रात्री, पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मिरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार झाला आणि दोन्ही देशांमधला सामरिक तणाव चरम सीमेला पोचला.

     त्यानंतर,तब्बल चौदा दिवसांचा साधकबाधक विचार आणि योग्य त्या सैनिकी संसाधनीय तैनातीनंतर,०६/०७ मे,२५च्या मध्यरात्रीनंतर, भारतानीऑपरेशन सिंदूरलाँच करून; हिजबुल मुजाहिदीन,लष्कर तायबा आणि जैश मुहम्मद या आतंकी संघटनांच्या नऊ ठिकाणांवर,दूर अंतरावरून,लांब पल्ल्यांच्या, हवेतून जमीनीवर तसच हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र/रॉकेट्स आणि लूटमार करणाऱ्या शस्त्रांचा (स्टँड ऑफ एयर टू ग्राउंड/ग्राउंड टू एयर मिसाईल/रॉकेट्स अँड लॉइटरिंग अम्युनिशन) मारा करून मोठा विध्वंस घडवून आणला. “या हल्ल्यात आम्ही काही भारतीय विमान क्षेपणास्त्र  पाडले आहेतअसा वादग्रस्त पण बिन पुराव्यांचा दावा पाकिस्ताननी केला.या हल्ल्याच्या प्रतिसादार्थ, ०७/०८ मे, २५च्या रात्री पाकिस्ताननी, “ऑपरेशन बन्यान मार्सूसअंतर्गत,भारतीय लष्करी चौक्या,संसाधन साठे आणि नागरी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यात अत्यल्प जीव आणि संसाधन हानी झालेल्या भारतानी  समानार्थी शस्त्रांचा वापर करून ते हल्ले परतवून लावलेत,विफल केले.०९/१० मे,२५च्या रात्री सामरिक  हिंसाचार वाढला, भारतानी पाकिस्तानच्या;रफिकी, मुरीद, चकलाला,रहीम यार खान नूर यार खान,सुकर आणि  चुनियन या सहा  प्रमुख धावपट्ट्यांसमेत,हवाई दलाच्या नऊ तळांवर प्रभावी हल्ले करून,तेथील विमान/क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा उध्वस्त केल्या आणि तीन विमानतळांच्या धावपट्ट्यांना (रन वे) मोठे खड्डे पाडून (क्रेटर्स) मोठ्या प्रमाणात हानी पोचवली. पाकिस्ताननी आपल्या परीनी हे हल्ले नाकामयाब करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलानूर यार खानवर झालेल्या हल्ल्यात अण्वस्त्र साठ्यांना धोका पोचून तेथे किरणोत्सर्ग सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.अमेरिकन अणूतज्ञ, अमेरिकेच किरणोत्सर्गशोधक विमान आणि इजिप्तहून बोरॉन खनिजांनी भरलेली दोन लष्करी मालवाहू विमान पाकिस्तानात आल्याच्या बातम्याही आल्यात.घाबरलेल्या पाकिस्ताननी,युद्धबंदी लागू करण्यासाठी अमेरिकेकडे मागणी केली.”तुम्ही भारताशी स्वतःहून बोलाअस सल्ला अमेरिकेनी पाकिस्तानला दिला. दुसरीकडे; अण्वस्त्र भांडारावरील या हल्ल्याबाबत काहीच माहिती नाही हे भारतानी, पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितल. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी कमिशननी किरणोत्सर्ग झाला नसल्याची ग्वाही दिली. १० मे, २५ला दुपारी दोन्ही राष्ट्रांच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्समधे बातचीत होऊनस्टॉप फायर अग्रिमेंटलागू करण्याबाबत सहमती झाली आणि त्याच दिवशी सायंकाळपासून दोन्ही बाजू थंड होऊ लागल्यात.अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी मात्र,या बाबतीत सात उलट सुलट बयान देऊन खळबळ माजवली आणि स्वतःच हसू करून घेतल. पण मुजोर पाक लष्कराच्या ड्रोन्सनी,१०/११ मे,२५च्या रात्री, जम्मू,अमृतसर,जैसलमेर,जामनगर आणि  कच्छवर हल्ला केला. भारतानी सर्व ड्रोन्स नष्ट केलेत,त्यानंतर १२ मे,२५ला युद्धबंदी पूर्णपणे लागू झाली जी पाकिस्तान/त्याचे पित्ते,पुढील काही आगळीक करे पर्यंत अस्तित्वात असणार आहे.सीमेवर काही किरकोळ उल्लंघन झाल असल तरी,युद्धाचे ढग सध्यातरी विखरलेले दिसून पडताहेत.या घटनांमुळे,भारतीय  लष्करी रणनीतीमधे झालेला एक महत्त्वाचा बदल दुर्लक्ष करण्या जोगा नाही. आपल वर्तन बदलण्यासाठी पाकिस्तानला कठोर सूचना (वॉर्निंग्ज) देण आणि आतंकी क्षमता कमी करण्यासाठी आकस्मिक हल्ल्यांचा अतिरिक्त/नवीन खर्च लादण हा,बदलत्या सामरिक धोरणाचा एक भाग आहे असा अंदाज केल्यास तो चूक नसेल.

       उरी, बालाकोट ते ऑपरेशन सिंदूर ही, मागील दोन दशकात,पाकिस्तानच्या आतंकी कारवायांना देण्यात आलेल्या भारतीय प्रतिसादाची प्रदीर्घ वाटचाल आहे.प्रतिसाद देण्याच्या पद्धतीत हळूहळू बदल करत, नव्या सामरिक कार्यपद्धतीच्या जोडीला नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भारतानी मारक संसाधनीय हिंसाचाराच मोठ चक्र सुरू केल.त्याचे  व्यापक परिणाम आता यापुढे दिसू लागतील.२०१६पासून, पाकिस्तानी चिथावण्यांना भारतानी योग्य तो लष्करी प्रतिसाद देण सुरू केल.त्यावेळी,उरी येथील हल्ल्याला दिलेल्या प्रत्युत्तर म्हणून भारताच्या स्पेशल फोर्सेसनी नियंत्रण रेखा ओलांडून, पाकमधील आतंकी लाँच स्टँड्सवर छापे टाकले. २०१९मधे, पुलवामा हल्ल्याला दिलेल्या आक्रमक प्रत्युत्तरात भारतानी, बालाकोट आतंकी ठिकाणावर हवाई हल्ला केला. १९७१ नंतर पहिल्यांदाच भारतानी  पाकिस्तानविरुद्ध हवाई शक्तीचा वापर करत सीमापारच्या पाकिस्तानी भूभागात प्रवेश केला.त्यामुळे;भारतीय निर्णयकर्त्यांना, युद्ध किंवा अणुहल्ल्याला चालना देता,लष्करी बळाचा वापर करता येतो/येईल हे उजागर झाल.या उत्क्रांतीला ऑपरेशन सिंदूरनी बळ मिळाल.या ऑपरेशनमधे क्षेपणास्त्र, लॉइटरिंग म्युनिशन आणि अन्य काही निवडक शस्त्रास्त्रांसह हल्ले केल्या गेलेत. बालाकोटमधे,हवाई शक्तीचा वापर हा मूलभूत निर्णय होता.उलटपक्षी ऑपरेशन सिंदूरमधे;हवेतून हवेत,हवेतून जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत किंवा जमिनीवरील लक्षांवर मारा करणारी अस्त्र ही भारताची मूलभूत ताकद होती.स्वदेशी ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र,इस्रायली स्पाइस बॉम्ब किट,भारतीय स्मार्ट बॉम्ब,हारोप लॉयटरिंग म्युनिशन,स्काल्प एयर लॉयटरिंग क्रूझ मिसाईल माउंटेड फ्रेंच रॅफेल विमान,स्वयंनिर्मित एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि रशियन एस ४००, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी,चीनी विमान/क्षेपणास्त्र विरोधी शस्त्रप्रणाली आणि चीनी/अमेरिकन विमानांचा धुव्वा उडवला.

        मागील दोन दशकांमधे प्राप्त केलेल्या सामारिक क्षमतांमुळे आता अशा कारवायांसाठी भारताकडे अनेक पर्याय आहेत.मोठी लष्करी हालचाल (मेजर मोबिलायझेशन) करता ही, मागील दोन दशकात आपण पाकिस्तानवर  हल्ले करू शकलो.२००४ पासून अस्तित्वात असलेल  “सिनर्जी ऑफ कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिनआता कालबाह्य झाल आहे)होत कारण २००१मधे संसदेवर झालेल्या आतंकी हल्ल्याच्या प्रत्युत्तरातीलजनरल मोबिलायझेशननंतर ही  आपण पाकिस्तानला धडा शिकवू शकलो नाही.पण, तरीही त्यावेळी,आपल्याला एकत्रित युद्धाचा (जॉइंट वॉर फेयर) नवा पर्याय मिळाला.तत्कालीन सरकारनी त्या वेळी,सरकारनी निष्क्रियतेचा पर्याय अंगिकारला कारण, आक्रमण सुरू झाल तर, युद्ध समाप्त होईस्तोवर त्यातून सहज बाहेर पडता आल नसत/येणार नव्हत. उलटपक्षी २०२५मधे; जलद कॅलिब्रेट केलेली, अनेक स्तरांच्या आक्रमक कोष्टकातून डागण्यात आलेली (मल्टि डोमेन डिस्ट्रिब्युशन) रॉकेट्स, क्षेपणास्त्र आणि ड्रोनसारख्यादूरवरून मारा करणाऱ्या शस्त्रांच्या  सहज लाटांद्वारे (वेव्ह्ज ऑफ स्टँड ऑफ वेपन्स) शत्रू नाश करता येतो शिवाय, आवश्यकतेनुसार ऑपरेशनची तीव्रता वाढवण्याची किंवा कमी करण्याची  लवचिकता मिळते हे,ऑपरेशन सिंदूरनी दाखवून दिल. ऑपरेशन सुरू झाल्यावर पाकिस्ताननी याची व्याप्ती/ आवाका (स्कोप) वाढवण्यासाठी ०७/०८ मे,२५च्या रात्री,भारतावर हल्ला करून, एकमेकांवर हल्ला/प्रतिहल्ला करण्याच एक मोठ चक्र सुरू केल. सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट हल्ल्याच्या वेळी केल होत तसच या वेळीही भारतानी जाहीर केल कीऑपरेशन सिंदूर,अचूक मोजमापानी केल्या जाणारी प्रतिबंधित कारवाई (प्रिव्हेन्टीव्ह अँड कॅलिब्रेटेड ॲक्शन) आहे”. २२ एप्रिलच्या नरसंहारांतर; लक्षणीय प्रतिघाती कारवाईसाठी वाढता देशांतर्गत दबाव, पंधरा दिवसांच्या निष्क्रियतेच विपक्षाच जहरी टिकास्त्र आणि काही सांसदांच्या प्रक्षोभक मागण्यांना दाद देता; ”पहलगाम पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला फक्त पाकिस्तानी भूमीवरून होणाऱ्या आतंकाला आळा घालायचा आहे,पाकिस्तानी लष्कर किंवा पाकिस्तानवर हल्ला करण्याची आमची इच्छा हेतू/मनिषा नाही.मात्र या कारवाईचा विरोध केल्यास होणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी थेट पाकिस्तानवरच असेलअस जाहीर करत सरकारनी,प्रतिघात सुरु केलाउरी आणि बालाकोट हल्ल्यांच्या वेळी झाल होत त्याच प्रमाणे या वेळीही पाकिस्तानवर हल्ला झाल्यावर त्यानी भारताला,तेथील जनतेला योग्य वाटेल/पटेल अस सॉलिड  उत्तर देण अपरिहार्य होत. त्यामुळे; ही ताडन कारवाई, लष्करी संघर्षात परिवर्तित होऊन चार दिवस चालली आणि दोन्ही बाजूंनी पूर्वीपेक्षा जास्त लक्ष्यांवर,जास्त घातक शस्त्रांचा मारा केला. प्रत्येक कारवाईनंतर झालेल्या परिणामांच विश्लेषणकेलेल्या कारवाई ऐवजी अजून कोणता पर्याय होता याची मिमांसा, कारवाईमुळे काय साध्य झाल आणि पर्याय अंगिकारला असता तर काय झाल/होऊ शकल असत, या सर्वांचा सखोल अभ्यास करून ऑपरेशन सिंदूरची आखणी केल्या गेली.

     अस्मादिकांनुसार;उरी ते बालाकोट ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत झालेला भारतीय सामारिक धोरण विकास त्याच अभ्यासाची परिणीती होती.उरीवरील आतंकी हल्ल्याच्या उत्तरात,पाक भूमीत चार पाच किलोमीटर आत जाऊन केल्या गेलेला सर्जिकल स्ट्राईक,अनेक आतंकी हल्ले झाल्यानंतरही, सामरिक दृष्ट्या निष्क्रिय राहण्याच्या अनेक वर्षांच्या सवयीनंतर लष्करी कारवाई करण्याच्या नवीन भारतीय मानसिकतेच प्रतीक होता.पुलवामातील सैनिकी संहारानंतर, ७० ते ८० किलोमीटर आत जाऊन  केल्या गेलेला बालाकोट हवाई हल्ला,शत्रू राष्ट्राच्या आत, खोलवर घुसून हल्ला करण्याची भारतीय क्षमता आणि सीमापार आक्रमकता त्याज्य मानण्याची मर्यादा ओलांडण्याची तयारी आहे हे दर्शविण्यासाठी केला गेला.त्या हल्ल्याच्या साफल्यानंतर भारतीय लष्कर/सरकारच्या मनात; “जर आपण आज बालाकोटपर्यंत जाऊ शकलो तर मग उद्या, बहावलपूर किंवा मुरीदकेपर्यंतही जाऊही भावना मूळ धरू लागली.त्या दृष्टीनी, जगभरातील लष्कर करत त्याच चालीवर भारतात ही, अनेकसामरिक युद्धाभ्यास: वॉर गेम्सआयोजित करण्यात आले असावेत.त्यासाठी, ”रियल टाइम इंटलिजन्सगोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असावी.त्या इंटलिजन्सच्या सखोल  विश्लेषणानंतर; टार्गेट्सची ओळख, त्यावरस्टँड ऑफ वेपन्सवर्षावासाठी लागणारा वेळ,अचूक कारवायांसाठी आवश्यक प्रशिक्षण, संसाधन त्यांच मोबिलायझेशन; यांचा सखोल अभ्यास केल्या गेला असावा आणि मगच या ऑपरेशनची संकल्पना ठाम  झाली असावी. भारतीय धुरंधरांना; आतंकी कुठे आहेत, किती आहेत, त्यांच्या जमीनी हवाई हल्ल्यापासून लागणाऱ्या संरक्षणाची काय सोय आहे, याबद्दल पूर्ण माहिती होती. त्यामुळेच ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या रात्री भारतानी नेमक्या आतंकी  ठिकाणांवर, आतंकी संघटनांना वास्तविक भौतिक नुकसान पोहोचवण्यासाठी केवळ २५ मिनिटांची प्रतिशोधात्मक कारवाई केली आणि पाकिस्तानमधे हाहाःकार उडाला.

    ऑपरेशन सिंदूरनंतर/मुळे,भारताच्या लष्करी प्रतिसादांची उत्क्रांती  स्पष्ट होते.”यापुढे भारत; कुठल्याही आतंकी हल्ल्याला योग्य तो लष्करी प्रतिसाद देईल, अण्वस्त्र वापरण्याच्या पाकिस्तानी धमकीला भारत यापुढे भीक घालणार नाही आणि भारत, आतंकी हल्लेखोर आणि त्यांच्या लष्करी/सरकारी  समर्थकांना समतुल्य मानेलहा; या उत्क्रांतीचा सिद्धांत,नवीन बेंचमार्क आणि गाभा आहे. आतंकवाद विरोधी नवीन भारतीय लष्करी रणनीती या पुढे; उरी हल्ल्या विरोधातील सर्जिकल स्ट्राईकचा आक्रमक पवित्रा किंवा पुलवामा हल्ल्याविरोधात बालाकोटमधे केल्या गेलेल्या, “या पुढे याद राखा”,या धमकावणीवजा हल्ल्याच्या प्रतीकात्मकतेवर समाधानी राहणार नाही हे नक्की झाल.नवीन रणनीतींतर्गत या पुढे,पाकिस्तानच्या लष्करी आतंकी संकुलावर थेट परिणामी हल्ला केल्या जाईल.या नवीन रणनीतीचा गाभा किंवा सिद्धांत, भारताच्या पूर्वीच्या दृष्टिकोनापेक्षा,एक सूक्ष्म परंतु महत्त्वाच्या तऱ्हेनी वेगळा आहे. मोठ्या दंडात्मक प्रत्युत्तराची धमकी दिल्यानी, पाकिस्तानी सरकार/ लष्कराला, आयएसआयप्रेरित आतंकी मोहिमेपासून परावृत्त करता येईल अशी भारताला आता अपेक्षा नाही. त्याऐवजी, त्यानी; पाकिस्तान लष्कर/सरकार भारताला अस्थिर करून, भौतिकदृष्ट्या बचावात्मक स्थितीत ठेवत, त्याची आक्रमक शक्ती रोखण्याचा प्रयत्न करत आहे हे सत्य स्विकारल आहे. आजपर्यंत आपण;संघर्ष परिस्थिती येताच  परस्परांवर विध्वंसक अणुप्रहार टाळण्याच्या प्रतिबंधकतेशी संलग्न होतो.त्यामुळे; थेट संघर्ष/अणु संघर्ष, प्रत्यक्षात परस्पर विनाशकारी असेल ही चिंता आणि अणु संघर्ष टाळण्यासाठी एखादी महासत्ता मध्यस्थी करेल या आशेनी १९९२नंतरच्या सर्व भारतीय प्रत्युत्तर कारवाया होत असत

Bharat - PakistanIndia - PakistanOperation SINDOORPOKऑपरेशन सिंदूर
Comments (0)
Add Comment