पाकिस्तान मधील शरिया कायदा आणि पहलगाम येथील अतिरेकी हल्ला. 

पाकिस्तान मधील शरिया कायदा आणि पहलगाम येथील अतिरेकी हल्ला.

भारतातून वेगळे झाल्यापासून पाकिस्तान हे राष्ट्र उदयास आले. निर्मितीपासून ते आज पर्यंत सर्व क्षेत्रामध्ये अपयशाच्या रांगेत अग्रेसर असलेला, खोट्या आश्वासनावर आणि राष्ट्र संकल्पने पासून वंचित राहिलेला हा पाकिस्तान नावाचा देश आपल्या अतिरेकी आणि सैनिकी व्यवहारामुळे रसातळाला गेला आहे. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी भ्याड हल्ल्यात पाकिस्तानचे प्रत्यक्ष सहभागिता दर्शविणारे अनेक पुरावे सुद्धा आता जमा झाले आहे. भारतीय हेर खात्याने असे अनेक पुरावे गृह आणि रक्षा मंत्रालयाला पाठविले सुद्धा आहे. असे भारतीय सामान्य हिंदू नागरिकांना त्रास देणे त्यांची हत्या करणे, भारतातील मुस्लिम समुदायाला देशद्रोह करण्यास प्रोत्सोहित करणे असे अनेक काम पाकिस्तान आपले पाळलेल्या अतिरेकी संघटनांच्या माध्यमातून सातत्याने करीत असतो.

आपल्या अनेक भारतीयांना हा एक गैरसमज दूर करावा लागेल तो म्हणजे पाकिस्तान हा त्याचा संविधानाने किंवा लोकशाहीने चालतो. पाकिस्तान हे एक इस्लामिक राष्ट्र आहे. आणि ते आज आणि उद्या सुद्धा फक्त इस्लामिक कायदानुसार चालणार आहे. बाकी सर्व जे चित्र आपल्याला दिसते ते अगदी मृगजळाप्रमाणे भ्रम उत्तपन्न करणारे आहे. आपण कमी पडतोय इस्लाम समजायला आणि इस्लामिक देशांना समजायला. जेव्हा जेव्हा पहलगाम सारख्या अश्या जिहादी वृत्तींची अनुभूती यायला सुरुवात होते. तेव्हा अमेरिका सारखे देश “वर्ल्ड डेकोरम” संतुलित ठेवण्यासाठी लोकशाहीच्या बाता करतात. कारण काही देशांचे या सर्व जिहादावर पोट भरत असते तर काही आंधळ्या इमान मनात ठेवणाऱ्या विशिष्ट धर्माचे धंद्यात वृद्धी होत असते.

मुळात पाकिस्तान हे राष्ट्र बनविणे एक योजनाबद्ध चाल इमाम आणि इमानची सक्ती करणाऱ्या धर्मांध्यांची होती. काय देश होता आमचा विचार करा.. हा जिहादी कचरा येण्यापूर्वी कश्यप ऋषींचा आमचा काश्मीर शक्तीचे साधना केंद्र होते. आणि आज त्याच शक्तीचे आराधना करणाऱ्या लाखो भक्तांचे या नंदनवनांत फुलांच्या ऐवजी रक्तांचा सडा पडतोय.

इस्लामिक राष्ट्रांची परिभाषा समजण्याचा प्रयत्न केल्यावर आंधळ्या व्यक्तीला दिसेल एवढ्या स्पष्ट शब्दात लिहिलेली व्याख्या आपल्या सारख्या डोळस व्यक्तींना मागील ९० वर्षात का वाचता आली नाही ? हे मला कळत नाही. ज्यांना वाचता आली त्यांची किंमत वेळगेल्यावर कळली परंतु आज काळ पुन्हा तेच चक्र फिरवत आहे. आज पुन्हा वाचायची आणि समजायची संधी आहे.

इस्लामिक राष्ट्र म्हणजे असे राष्ट्र क़ुरान मधील काही संदर्भ काय सांगतात बघा

सूरह अल-मायदा (५.४४)

– जे लोक अल्लाह च्या आसमानच्या खाली राहत आहेत त्यांनी त्याचा सर्व नियमांचे पालन केले पाहिजे आणि असे एक छत्री अल्लाहच्या नावाने सत्ता स्थापित केली पाहिजे

सहीह बुखारी (खंड ४, पुस्तक ५२, हदीस २०५)

– जे लोक इस्लामिक कायदानुसार राज्य करतात तेच लोक अल्लाहच्या रस्त्यावर आहेत.

अल-सियासा अल-शरियाह” इब्न तैमिया*

– इस्लामिक राष्ट्रात त्याचे सिद्धांत आणि विचारांचे वहन करणे कर्तव्य म्हटले आहे.

वरील सर्व संदर्भाचा सारांश काढला तर लक्षात येईल इस्लामिक राष्ट्र म्हणजे असा राष्ट्र जिथे इस्लाम धर्माचे नियम आणि शरियाच्या कायदानुसारच शासन चालेल.

मग प्रश्र्न उत्तपन्न होतो की पाकिस्तानचे पण सांविधान आहे. त्यांचे पण दंड संहिता आहे मग हे कसे चालत असेल. तर याचे उत्तर पाकिस्तानच्या संविधानातच दडलेले आहे.

॰ पाकिस्तानच्या संविधानातील अनुच्छेद २२७ नुसार हदीथ आणि कुराण ही देशातील सर्वोच्च कायद्याचे पुस्तक असणार

० पाकिस्तानच्या संविधानातील अनुच्छेद २२८ नुसार पाकिस्तानचा कायदा हा कुराण आणि शरियाच्या नुसार बनविण्यात येईल.

या व्यतिरिक्त पाकिस्तान मधे शरिया न्यायालय सुद्धा आहे ज्यात खटले चालविले जातात. पाकिस्तानचे धार्मिक आणि नैतिक गोष्टी ह्या शरिया नुसार लागू होतात तर राज्यांचे नियम हे पाकिस्तानच्या संविधानानुसार निर्धारित होतात. आणि परराष्ट्र धोरण हा विषय पाकिस्तानच्या नैतिक विभागात येतो त्यामुळे परराष्ट्र धोरण हे शरिया नुसार चालते म्हणजेच दुसऱ्या देशावर होत असेलेल अतिरेकी हल्ले असो वा शत्रूराष्ट्रां सोबत केलेली कुरघोडी असो हे शरिया नियमानुसारच होत असेल असे म्हण्यात काही चुकीचे नसणार.

अगदी सोप्या भाषेत सांगितले तर तालिबान या आतंकी संघटनेचा खटला जेव्हा पाकिस्तानच्या शरिया न्यायालयात चालतो तेव्हा सर्व आतंकवादी कैद्यांची न्यायालया मार्फत सुटका केली जाते.

या खटल्यात तालिबानने पाकिस्तान मधील इस्लामचे नियम न पाळणाऱ्या निर्दोष २५ मुस्लिम लोकांना कंठस्नान दिले.

मग प्रश्न येतो भारतातील पाकिस्तानचे खुलेआम समर्थन करणाऱ्या टोळीला हे कृत्य सांविधानिक वाटते का ? ते सोडा हे कृत्य मानवीय सुद्धा वाटते का ?

वाटत नसेल तर मग अश्या जिहादी गोष्टींचे समर्थन करणाऱ्या भारतीय जिहादण्यांवर कारवाही का होत नाही ?

आणखी एक उदाहरण म्हणजे शरिया कायदानुसार गैरमुस्लिम लोकांना मतदान करण्याचे अधिकार पाकिस्तानात नाहीत. त्यांना मतदान करण्याचे अधिकार पाकिस्तानच्या संविधानाने दिले आहे.

शरिया आणि पाकिस्तानी संविधान यांच्या मधे मोठे वाद आहेत असे अनेक केसेस पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यापैकी खलिल काही…

1. अस्मा जहांगीर वि. फेडरेशन ऑफ पाकिस्तान (केस क्रमांक 17/2015) सर्वोच्च न्यायालय पाकिस्तान

– याच केस मुळे गैरमुस्लिम लोकांना न्यायालयीन लढाई लडण्याचा अधिकार दिला.

– सर्वोच्च न्यायालय निर्णय:- सर्व शरिया न्यायालय हे पाकिस्तानच्या संविधानाच्या आधीन असतील.

2. गुल जमान विरुद्ध राज्य (केस क्र. 58/2010) सर्वोच्च न्यायालय पाकिस्तान

– या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शरिया न्यायालयाचा विरोधात जाऊन निर्णय दिला की इस्लामला न मानणाऱ्या व्यतींचे झालेले खुन हे कायद्याच्या नुसार गुन्हा असतील

– म्हणजे यापूर्वी गैरमुस्लिम मुर्ताद मुस्लिमांची हत्या ह्या हत्याच्या व्याख्यात येत नव्हत्या.

वरील विषयातून आपल्या लक्षात येईल की इस्लामिक राष्ट्र आणि त्याचा शरिया गैरमुस्लिम व्यक्तींसाठी किती घातक आहे.

परंतु प्रश्न पुन्हा जातो पहलगामवर की पहलगामच का ? आमचा काश्मीरच का ? काफिरच का ? भारताची जमीनच का ?

याचे उत्तर अनेकांना पटणार नाही परंतु हे एक सत्य आहे आणि हे आपण आज समजून घेतले पाहिजे

होय ! पहलगाम मधील अतिरेकी हल्ला आणि यापूर्वी पाकिस्तानने आतंकवादांच्या सहकार्याने भारतावर केलेले सर्व भ्याड हल्ले हे पाकिस्तानी शरिया कायद्यानुसार झाले.

मी शांतीप्रिय इस्लाम बद्दल बोलत नाही आहे. मी बोलतोय शरिया कायद्यावर,कोणताच धर्म वाईट सांगत नाही, परंतु त्याचे कायदेच चुकीचे असतीत तर असे कायदे जाळून टाकायला मुस्लिम समाजातील कोणी भीमराव का समोर येत नाही ? कारण हे जिहादी कायदे इस्लामी धर्मांध्यांनी केले आहेत. एखादा परिवर्तनशील असलेला मन्सूर सारखा व्यक्ती जेव्हा इस्लाम धर्मात जन्मायला येतो आणि “अन अल हक “चा नारा त्याच्या माध्यमातून दिला जातो. तेव्हा हा जिहादी समाज त्याला दगडाने ठेचून मारतो . मग अश्या अवस्थेत कोणता मन्सूर तयार होईल ? बदल कसा होईल आतंकवाद कसा संपेल?

असो ! पहलगाम मधील हल्ल्याचे जर आपण विश्लेषण केले तर आपल्या लक्षात येईल की पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलेली प्रत्येक कृती ही शरिया कायद्या नुसार होती

त्याचा क्रम पुढील प्रमाणे-

1. हल्ला हा शत्रू राष्ट्रावर झाला

– कुराण (८.६०) नुसार “दुश्मन देश को हराओ उसे खत्म करो”

– भारत हा पाकिस्तानचा सर्वात मोठा शत्रु आहे आणि हा हल्ला शरियानुसार पाकिस्ताने केला. भारताला संपविण्यासाठी

2. Target killing ( फक्त काफिरांना मारल्या गेले)

– कुराण ( ४.८९) नुसार “सिर्फ काफीरो से लडाई करो”

– हल्ल्यात फक्त गैरमुस्लिमांना मारल्या गेले.

3. मुस्लिमांना आतंकवाद्यांकडून सोडून दिल्या गेले

– कुराण (४.९४) नुसार “मुसलमानो को नुकसान ना पोहोचाओ”

– मुस्लिम महिला पुरुष यांना सोडून दिल्या गेले

– अनेकांना असा प्रश्न पडला असेल की हिंदू स्त्रियांना पण सुद्धा आतंकवाद्यांनी सोडले तर त्याचे उत्तर असे की काफिरांच्या महिला आणि त्यांची संपत्ती “माल ए गनीमत “ असते. म्हणजे ते फक्त उपभोग घेण्यासाठी असते.

4. हल्ला “जज्बा ए जिहाद “ नुसार झाला

– कुराण (२.१९०) नुसार “जिहाद करणे वालो को इनाम मिलेगा”

– पहलगाम हल्ल्यात हल्लेखोर यांना मोठी किंमत त्यांच्या आकांकडून मिळाली होतीच. तसेच जन्नत नावाची सर्वात मोठी किंमत तर आहेच.

वरील विषयाला स्पर्श करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. बाकी सर्व आपण आपल्या बुद्धिमतेनुसार आणि आकलन क्षमतेनुसार या विषयाचे परीक्षण करू शकतात. सत्य बोलणारी लोक आज समाजात नाही असे नाहीत वाईट गोष्टींना विरोध करणारे लोक समाजात नाहीत असे सुद्धा नाही. हे सर्व मंडळी आपले ज्ञान फक्त एकाच धर्मावर पाजळतात. खरी सुधारणा आणि परिवर्तन जर आज आवश्यक असेल तर ते मुस्लिम समाजात आहे. काश्मिरी मुस्लिम युवा हातात दगड जेव्हा घेतो याचा आनंद बाजूच्या देशाला होत असतो. परंतु तोच मुस्लिम युवा जेव्हा हातात लेखनी पकडेल, तिरंगा पकडेल तेव्हा नाराज सुद्धा बाजूचाच देश होईल . एकंदरीत काश्मीर हे कायम एक अस्थिर राज्य राहावे. तेथील विकास काम थांबावे, रोजगार थांबावा, शिक्षण थांबावे अशी इच्छा मनात ठेवून कार्य करणाऱ्या पाकिस्तानला सर्व प्रकारे आळा घालण्याची वेळ आली आहे. मागील २ वर्षात काश्मीर मधे सर्वाधिक पर्यटक गेलेत. हेच कुठेतरी बाजूच्या देशाच्या मनात वेदना देत असेल, काश्मीर आता पुन्हा राष्ट्रवादाकडे जाऊ नये,याच भीतीपोटी केला गेलेला हा जिहादी हल्ला अत्यंत निंदनीय आहेच आणि ही पाकिस्तानची वृत्ती सुद्धा निच आहे.

अनेक विषय आतंराष्ट्रीय स्तरावर भारताने अगदी रोखठोक पणे मांडले आहे. भारत कायम दहशतवादाच्या विरोधात आहे. आपली भूमिका आज रणांगणात मांडण्याची वेळ आली आहे.

शेवटी हेच… तुम्हाला माहिती आहे की तुम्ही असे युद्ध लढत आहात ज्यात कोणताच नियम अटी हे विरोधक मानणार नाहीत. मग अश्या युद्धात नितियत्ता आणि नियम,कायदे सांगणे निरर्थक आहे.

हे अर्जुन ! अब रणनीती नही , केवल रण होगा …

संदर्भ-

कुराण

हदीथ

पाकिस्तानचे संविधान

पाकिस्तानी दंड संहिता

शरिया कायदा

– ॲड संकेत राव.

Comments (0)
Add Comment