“खालिद का शिवाजी” चित्रपटातील रायगडावरील मशिदीचा पुरावा काय ?

0

खालिद का शिवाजी” चित्रपटातील रायगडावरील मशिदीचा पुरावा काय ?

राज मोरे दिग्दर्शित ‘खालिद का शिवाजी’ या आगामी चित्रपटात अनेक खोटे ऐतिहासिक दावे केल्याचे त्याच्या ट्रेलरमधून स्पष्ट दिसत आहे. सदर चित्रपटात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५% मुसलमान होते, त्यांचे ११ अंगरक्षक मुसलमान होते असे खोटे दावे केले आहेतच त्याच बरोबर राज मोरे यांनी शिवरायांनी मुस्लिमासाठी रायगडावर मशिद बांधली असा अतिशय कपोलकल्पित इतिहास प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.तिन्ही बाबींचे पुरावे मात्र दिले नाहीत त्यामुळे शिवरायांनी मुस्लिमासाठी रायगडावर मशिद बांधली होती का? पुढे किंवा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्या मशिदीचे काय झाले किंवा आज त्या मशिदीचे काही अवशेष उपलब्ध आहेत का? असे अनेक प्रश्न “खालिद का शिवाजी” चित्रपट निमित्ताने उपस्थित झालेले असून त्या प्रश्नावर चर्चा होणे आवश्यक होते.वास्तविक पाहता ऐतिहासिकदृष्ट्या रायगडावर कधीच कोणतीही मशिद नव्हती आणि जर मशिद असती किंवा त्याचे अवशेष जरी उपलब्ध असते तर देशातील सारा मुसलमान रायगडावर नमाज साठी जाणीवपूर्वक एकवटला असता तेथे रमजान ईद तथा इफ्तार पार्ट्या सुद्धा झाल्या असत्या. आणि मतांच्या राजकारणासाठी आपल्याच षंढ राजकारण्यांनी त्यांना मदतच केली असती त्यांच्या पाठीशी उभे राहून प्रोत्साहन सुध्दा दिले असते ही आपल्या देशातील राजकीय वस्तुस्थिती असून ती कोणीही नाकारू शकत नाही.त्यामुळे “खालिद का शिवाजी ” या खोट्या चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण आजचा खोटा इतिहास भविष्यात किंवा पुढील पिढी साठी परंपरा किंवा इतिहास ठरत असतो.

रायगडावर मशिद असल्याचा दावा कितपत खरा ?

महाराष्ट्रातील काही बेगडी व स्वार्थी विचारवंत हे शिवकालीन इतिहासाचे विकृतिकरण करण्याचा सतत प्रयत्न करीत आहे त्यासाठी त्यांनी वेगवेगळे नॅरेटिव्ह प्रस्थापित करून अजेंडे राबविले आहेत, याच बेगड्या मंडळीनी पाहिले शिवरायांच्या सैन्याचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला आता तीच मंडळी शिवरायांनी रायगडावर मुस्लिमासाठी मशिद बांधल्याचा खोटा दावा करीत आहे वास्तविक पाहता ऐतिहासिक कागदपत्रामध्ये शिवरायांनी मशिद बांधल्याचा एकही पुरावा नाही गेल्या काही वर्षात रायगडावर भारतीय पुरातत्व विभागाकडून वेगवेगळे उत्खनन झालेले आहे त्यामधुन अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत परंतु तेथे मशिद अस्तित्वात असल्याची कोणतेही अवशेष आढळून आले नाही नगारखाना, मनोरे, बुरुज व श्री जगदीश्वर मंदीर तथा टकमक टोक,हिरकणी,भवानी आणि श्रीगोन्दे असे चार टोक आजही असून इतर वास्तु भग्न अवस्थेत आहेत रायगड वरील हत्ती तलाव आणि पाण्याचा निचरा होण्या साठी दगडी नाल्या आणि इतर सर्व बांधकाम हे बांधकामाचा आदर्श नमुना आहे इतिहासा मध्ये रायगड किल्ल्याचे नाव “रायरी किल्ला” होते शिवरायांनी सन 1656 मध्ये चंद्रराव मोरे कडून रायरी किल्ला काबीज करून रायरी किल्ल्याचे रायगड किल्ला नामकरण केले. यापूर्वी शिवरायांचा कारभार राजगड येथून होत असे पण हिंदवी स्वराज्याची नवीन राजधानी रायगडाची बांधणी हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखेखाली झाले आहे. बांधकामानंतर सन 1668 पासून स्वराज्याचा कारभार रायगड वरुन सुरु झाला होता.शिवरायांचा राज्याभिषेक सुद्धा रायगडावरच झालेला असून हिरोजी इंदुलकर यांनी रायगडावर कोण कोणती बांधकामे केली,त्याचा शिलालेख उपलब्ध आहे. सदर शिलालेखामध्ये जगदीश्वराचे मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे पण मशिद बांधल्याचा उल्लेख नाही तरी सुद्धा शिवरायांनी मुस्लिमांसाठी रायगडावर मशिद बांधल्याची खोटी कहाणी “खालिद का शिवाजी” चित्रपटद्वारे रचण्यात आली आहे. हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र नाही ना? अशी चर्चा महाराष्ट्रातील शिवप्रेमी करत आहेत.

तर सारा मुस्लिम समाज रायगडावर एकवटला असता – 

छत्रपती शिवरायांनी मुस्लिमांसाठी रायगडावर मशिद बांधली होती असा कांगावा महाराष्ट्रात सतत केला जातो आणि “खालिद का शिवाजी मध्ये तेच झालेलं आहे.वास्तवात शिवरायांनी रायगडावर जगदीश्वराचे मंदीर बांधल्याचा ऐतिहासिक संदर्भ आढळतो परंतू मशिद बांधल्याचा एकही संदर्भ आढळत नाही काही अज्ञानी मंडळी जगदीश्वरांच्या मंदिराला मशिद समजतात.भारतीय पुरातत्व विभागा कडून तेथे उत्खन झाले असता मशिदीचे कोणतेही अवशेष आढळून आले नाहीत. जर खरेच रायगडावर मशिदीचे काही अंश जरी उपलब्ध असते तर महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील सारा मुस्लिम समाज रायगडवर नमाज अदा करण्यासाठी एकवटला असता तसेच आपल्याच राजकीय मंडळीनी तेथे भव्यदिव्य मशिद उभी करून दिली असती व आपली धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी रायगडावर रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजनसुद्धा केले असते,कारण आपल्या कडे हिंदु दहशतवाद शब्द प्रयोग करणारे कोंढव्यात हज हाऊस बांधायची इच्छा बाळगणारे कुरआनचा आदेश ईश्वराची अंतिम आज्ञा मानणारे,इफ्तार पार्टया झोडून धर्म घरात आणि नमाज रस्त्यावर चालेल असा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरेली मंडळी आपल्या महाराष्ट्रात आहे. विशाळगडाप्रमाणे येथेही उरूस भरला असता.

तात्पर्य एकच रायगडावर कधीही मशिद नव्हती हे सुर्यप्रकाशाएवढे सत्य आहे.

रायगडाला का लक्ष्य करण्यात येत आहे ?

सह्याद्रीच्या कुशीतील उभा असलेला रायगड फक्त एक किल्ला नाही किंवा केवळ पुरातन वास्तु सुध्दा नाही. रायगड देशातील नव्हे जगातील हिंदू समाजाचे प्रेरणास्थान आहे. विजयाची साक्ष देणारी माती आहे.देशातील शिवभक्त रायगडावर जातो तेव्हा तेथील माती आपल्या मस्तकावर लावून कृतज्ञता व्यक्त करत असतो. कारण याच रायगडावर जेष्ठ त्रयोदशी 1674 शिवरायांचा हिंदवी स्वराज्याची अर्थात हिंदू साम्राज्याची अधिकृत घोषणा झाली होती. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक इथेच झाला होता. शिवराय सिंहासनाधिश्वर झाले होते ते इथेच. एका सार्वभौम हिंदू राज्याची राजधानी असा रायगडचा लौकिक निर्माण झाला होता. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर रायगडाची प्रेरणा घेऊन देश जुलमी इस्लामी सत्ते विरुद्ध उभा राहिला होता. देशात होत असलेला अन्याय अत्याचार व निपराधांच्या कत्तली छत्रपती शिवरायांमुळे थांबल्या.महिलांना सुरक्षा मिळाली, हिंदु मंदिरांचा विध्वंस आणि जबरदस्तीची बाटवाबाटवी थांबली, सर्वात महत्वाचे जझीया कर थांबला त्यामुळे रायगड केवळ किल्ला नसून देशाची प्रेरणा आहे.येथूनच प्रेरणा घेऊन देशातील अनेक हिंदू राजांनी इस्लामी सत्तेविरूद्ध उठाव केला. त्याकाळी वीर दुर्गादास राठोड, राजा छत्रसाल,गुरु गोविंदसिंह,वीर बंदा बैरागी अशा असंख्य हिंदू वीरांनी इस्लामी सत्तेला सळो की पळो करून सोडले. राजा छत्रसालपासून आसामचा वीर लाचित बोरफुकनसुद्धा याच प्रेरणेला साक्षी ठेऊन इस्लामी सत्तेविरुद्ध लढले. इस्लामी आक्रमणे तलवारीच्या जोरावर रोखण्यात ते यशस्वी झाले. म्हणूनच बाजारू विचारवंताच्या टोळ्या रायगडावरच्या इतिहासाला लक्ष्य करीत आहेत. रायगडावर मशिद बांधल्याचा कांगावा करून आणि आपल्या प्रेरणास्थानावर खोटा इतिहासाचा आघात करुन शिवभक्तांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यामुळे शिवभक्तांनी सजग होणे आवश्यक आहे.कारण आज सांगितलेला खोटा इतिहास भविष्यात येणाऱ्या पिढीचा विनाश करणारा ठरेल.त्यामुळे “खालिद का शिवाजी” चित्रपटाचा सर्व स्तरामधुन विरोध होत आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. ( Photo Google)

Leave A Reply

Your email address will not be published.