शिवकालीन इतिहासातील मदारी मेहतर एक काल्पनिक पात्र ?

0

शिवकालीन इतिहासातील मदारी मेहतर एक काल्पनिक पात्र ? महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून शिवकालीन इतिहासाची प्रचंड मोडतोड होत आहे.पुरोगामी आणि सेक्युलर विचारांच्या हव्यासापायी इतिहासातील सोईचे व अर्धवट संदर्भ देऊन आपल्या मनात येईल तसा खोटा इतिहास प्रस्तुत करण्यात येत असून नकली इतिहासकारां मध्ये चढाओढ लागली आहे काही स्वयंघोषित इतिहास संशोधक आणि विचारवंता मध्ये इतिहास प्रदूषित करण्याची स्पर्धा लागल्याचे चित्र उभे झाले आहे. महाराष्ट्रात काही समाजविघातक टोळ्या शिवकालीन इतिहास प्रदूषित करून शिवरायांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा तयार करण्यासाठी खोटा इतिहास रेटून अनेक काल्पनिक पात्र सुद्धा उभे केले जात आहेत.छत्रपती शिवरायांनी औरंगजेब बादशाहाच्या हातावर तुरी देऊन आग्राच्या कैदेमधुन दि.१७ ऑगस्ट १६६६ गोकुळअष्टमीच्या दिवशी चातुर्याने आपली सुटका केली होती. त्यासंदर्भात मदारी मेहतर यांचा संदर्भ दिला जातो तसेच मुस्लिम सेवक म्हणून मदारी मेहतर यांचा उल्लेख करून संभ्रम निर्माण केला जात आहे. सेनापती म्हणून नूरखान बेगपासून शिवरायांचे गुरू म्हणून बाबा याकूत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. त्याच प्रमाणे मदारी मेहतर हे खोटे पात्र समोर आणल्या जात आहे,वास्तविक पाहता शिवरायांच्या शिवकालीन इतिहासामध्ये मदारी मेहतरच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही किंवा अस्सल समकालीन साधनात त्याचा उल्लेख नाही. “खालिद का शिवाजी” चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्रात खोट्या शिवकालीन इतिहासाची चर्चा सुरू असून त्यात मदारी मेहतर काल्पनिक पात्रावर खुली चर्चा करणे आवश्यक आहे. कारण शिवरायांच्या आग्र्याच्या सुटकेनंतर इतिहासामध्ये हिरोजी फर्जंद यांचा उल्लेख आढळतो मात्र मदारी मेहतरचा उल्लेख आढळत नाही.पुढे मदारी मेहतरांच काय झाले ? त्यामुळे मदारी मेहतर या पात्रावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे.

आग्र्या मध्ये पोहचले शिवराय –

छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानंतर औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त औरंगजेबाच्या निमंत्रणानुसार आग्रा भेटीला गेले होते.स्वराज्याचा कारभार मातोश्री जिजाऊ यांच्या कडे सोपवून आपल्या काही मावळ्यांसोबत दि 5 मार्च 1666 रोजी आग्रा दिशेने निघाले होते.दि.12 मे 1666 रोजी शिवराय बाल शंभू राजांच्या सह आग्रा दरबारात पोहचले.औरंगजेबाच्या आग्रा दरबारात शिवरायांचा योग्य सन्मान करण्यात आला नाही. मुद्दाम शिवरायांचे आसन ताहीरखानच्या मागे कमी दर्जाच्या म्हणजे मागच्या तिसऱ्या रांगेत ठेवलें गेले होते. तसेच शिवरायांचे आग्रा शहरात यथोचित स्वागत करण्यात आले नाही किंवा दरबारातील कोणताही मोठा अधिकारी स्वागतासाठी आला नव्हता.त्यामुळे दरबारात जे काही घडत होत त्या विषयी शिवराय प्रचंड संतापले, त्यांनी औरगजेबानी दिलेली खिल्लत सुद्धा झिडकारली. बादशाहाच्या दरबारात सिंहगर्जना केली.बलाढय मुघली तख्ताला पाठ दाखवून शिवराय दरबारातून बाहेर पडले. त्यामुळे शिवराय व बाल शंभूराजे यांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला.फुलादखानाच्या देखरेखीत कडक पहारे बसवण्यात आले.

नजरकैदेत असतांना औरंगजेब कडून घातपात घडवून आणण्याच्या दुष्ट हेतूने चौक्या बसवून सुरक्षा सुद्धा वाढविण्यात आली होती पण औरंगजेबाचा घातपाताचा दुष्ट हेतू लक्षात येताच शिवरायांनी आपल्या सहकाऱ्यासोबत चर्चा करून बादशाहाच्या हातावर तुरी देऊन निसटण्याचीयोजना आखली.

कंसाच्या तावडीतून कृष्ण सुटला –

छत्रपती शिवराय आग्र्याच्या कैदेत असताना औरंगजेबाचा दुष्ट हेतू लक्षा त्यांना लक्षात आला. त्यांनी आपल्या सोबत असलेल्या मावळ्यांना योजनापूर्वक आग्र्याच्या बाहेर पाठविले. आजारी असल्याचे सोंग घेतले. आजार पणातून बरे व्हावे म्हणून त्यांनी साधुसंत, फकीर यांना मिठाई पाठविण्याची दरबारमधुन मागणी मंजूर करून घेतली. मिठाईचे पेटारे पाठविण्यात सुरूवात केली आणि त्याच मिठाईच्या पेटाऱ्यामधुन बादशहाच्या हातावर तुरी देऊन निसटण्याची योजना आखली. दि.17ऑगस्ट रोजी कृष्णजन्मअष्टमी दिवशी शिवरायांच्या जागी हिरोजी फर्जंद झोपले व काल्पनिक पात्र मदारी मेहतरांचा उल्लेख आहे.अस्सल इतिहासात मदारी मेहतरांचा उल्लेख नाही. शिवराय व बाल शंभू राजे मिठाई पेटाऱ्या मधुन निसटले शिवराय मथुरेत पोहचले त्यांनी वेश बदलून संन्यासाचा वेश धारण केला बाल शंभू राजे यांना मथुरेत ब्राम्हण असलेल्या मोरोपंत पिंगळे यांची बहीण लक्ष्मीबाई विसाजीपंत, कृष्णाजीपंत यांचे जवळ ठेवून ते निघाले आणि दि.२० नोव्हेंबर १६६६ रोजी राजगडावर दाखल झाले. मातोश्री जिजाऊ यांच्या चरणावर मस्तक ठेवले.शिवरायांच्या आग्रा ते राजगड प्रवासा बाबत तथा तारखा बाबत राजस्थानी इतिहास,सेतू माधव पगडी,जदुनाथ, बखर मध्ये अनेक मत मतांतरे असून त्यामध्ये मदारी मेहतरांचा उल्लेख नाही.अशा प्रकारे शिवराय आग्र्याहून निसटले. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण कंसाच्या तावडी मधुन बाहेर पडले त्याचप्रमाणे कंसरुपी औरंगजेबाच्या हातावर ‘मिठाई’ देऊन निसटले.

जगातील रोमांचकारी घटना –

औरंजेब हा अत्यंत क्रूरकर्मा शासक होता,त्याने आपल्या बापालासुद्धा कारागृहात डांबून छळ केला होता. त्यामुळे शिवरायांच्या आग्रा कैदेमुळे स्वराज्यात चिंता निर्माण झाली होती.परंतू शिवरायांनी चातुर्य दाखवून स्वतःची बाल शंभूराजे आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांची सुखरूप सुटका करून घेतली. ही जगाच्या इतिहासातील अतिशय रोमांचकारी घटना आहे.त्यामुळे औरंगजेबाची जगभर प्रचंड नाचक्की सुध्दा झाली होती.शिवरायांच्या आग्रा भेट व सुटका इतिहास मध्ये शिवराया सोबत त्र्यंबक सोनदेव डबीर, निराजी रावजी,रघुनाथपंत बल्लाळ,हिरोजी फर्जंद,बाजी जेधे,बहिर्जी नाईक,येसाजी कंक,अनेक मावळे असल्याची नोंद आहे परंतु मदारी मेहतर यांच्या नांवाची नोंद आढळत नाही. त्यामुळे *खालिद का शिवाजी”चित्रपट निमित्ताने खोट्या इतिहासाची चर्चा सुरू असून शिवरायांच्या आग्रा भेटीतील मदारी मेहतर या काल्पनिक पात्रावर खुली चर्चा करण्याची आवश्यकता आहे.

अशोक राणे,  भ्र.९४२३६५८३८५

Leave A Reply

Your email address will not be published.