नेपाळची हिंदू अस्मिता पुसण्याचा इस्लामिक जिहाद्यांचा कट.
नेपाळच्या केंद्रीय सांख्यिकी ब्युरोने प्रकाशित केलेल्या ताज्या जनगणनेच्या अहवालानुसार एकूण लोकसंख्येपैकी ८१.१९ टक्के लोक हिंदू आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोक बौद्ध धर्माचे – ८.२ टक्के आहे. गेल्या १० वर्षांत देशात हिंदू संख्येमध्ये ०.११ टक्क्यांनी आणि बौद्धांच्या संखेमध्ये ०.७९ टक्क्यांनी घट झाली आहे. याहूनही भीषण परिस्थिती म्हणजे तेथील मुस्लिमांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. हिंदूं बहुल असलेल्या नेपाळ या देशात ख्रिचन आणि मुस्लिमांची संख्या आशी झपाट्याने वाढवण्यासाठी अनेक विघातक गोष्टी जबाबदार आहेत.
गरीब, गरजू लोकांना वेठीस धरून त्यांना धार्मिक शिक्षण देण्याचे षडयंत्र
नेपाळमधील कपिलवस्तू, रौतहट, बांके आणि डांग सारख्या जिल्ह्यांतील गरीब आणि अनाथ हिंदू मुलांना हिमालय एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी या स्वयंसेवी संस्थेकडून संबंधित वसतिगृहांमध्ये सरकारी अभ्यासक्रमाऐवजी इस्लामिक ग्रंथ शिकवले जात होते.
हिमालय एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी या स्वयंसेवी संस्थेला दरवर्षी सुमारे २.५ कोटी नेपाळी रुपये मिळत होते, ज्यामध्ये तुर्कीस्थित अनेक इंटरनॅशनलचा निधीही समाविष्ट होता. या निधीतून गरीब गरजू मुलांना ओळखून त्यांना इस्लामिक शिक्षण दिले जात आहे.ज्यामुळे नेपाळमधील गरीब हिंदू मुलांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जाते .तर इंडोनेशियातील इस्लामिक शिक्षक धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी पर्यटक व्हिसावर नेपाळमध्ये प्रवेश करत होते. नेपाळमध्ये वैध अनुमती नसलेल्या परदेशी नागरिकांकडून लहान हिंदू मुलांना कुराण शिकवले जात असल्याचे उघड झाले आहे आणि त्यानंतर अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले तेव्हा हे चौकशीत समोर आले की, तुर्कीसारख्या परदेशी शक्ती नेपाळ मधील गरीब आणि अनाथ हिंदू मुलांना फसवून लोकसंख्येचे धार्मिक संतुलन पालटण्याचा प्रयत्न करत आहेत.
नेपाळच्या अभ्यासक्रमात धार्मिक शिक्षणाचा समावेश नाही, मात्र या स्वयंसेवी संस्थांकडून धार्मिक शिक्षण दिले जात होते. काही संस्थांना प्रतिवर्षी जवळपास अडीच कोटी नेपाळी रुपये परदेशी संघटनांकडून मिळत आहेत. त्यात तुर्कीस्थित ६ आंतरराष्ट्रीय संघटनाही आहेत. तसेच इंडोनेशियातील अनेक इस्लामी शिक्षक पर्यटक व्हिसावर नेपाळात येतात आणि धार्मिक प्रचार करतात. हे नेपाळच्या स्थलांतर कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे.
अशा प्रकारच्या हालचाली कायदा मोडून देशाच्या सुरक्षेलाही आणि अनेक हिंदू मुलांच्या भविष्याला धोका निर्माण करत आहेत. फसवून धार्मिक शिक्षण देणे व त्यामाध्यमातून धर्मांतरण घडवून आणणे हेच यामागचे सत्य आहे.
१५ किमीच्या परिघात १५० मदरसे आणि मशिदी
उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात सीमेपासून १५ किलोमीटरच्या आत अंदाजे १५० मदरसे कार्यरत आहेत. त्याशिवाय सीमाभागाच्या नेपाळ बाजूला १५ किलोमीटरच्या परिघात सुमारे २०० मशिदी आहेत. मशिदीतच सुमारे दहा ठिकाणी मदरसे कार्यरत आहेत.
ही भयावह आकडेवारी इस्लामने धर्म वाढवण्यासाठी घातलेला घाट दाखवते. सर्व गोष्टींचे इस्लामीकरण करावे या फसव्या हेतूने हे लोक व्यवसायापासून ते शिक्षणापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये पाय पसरत आहे.
मशीद आणि मदरश्यांची संख्या जर याच आकडेवारीत वाढत राहिली तर याचे अनके घातक परिणाम नेपाळी हिंदूंना सहन करावे लागतील. सीमाभागात वाढलेल्या या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे नेपाळी हिंदू त्रस्त झाला आहेत. शिवाची याचना करणारे हे कट्टर शिवभक्त हिंदू यांना या वाढलेल्या अतिक्रमणामुळे अनेक गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हिंदू सण साजरे करणे एक आव्हान
गेल्या २० वर्षात अनेक मुस्लीम नेपाळमधील अनेक गावात स्थलांतरित आणि स्थायिक झाले आहेत. या असमतोलाचे मुख्य कारण म्हणजे मुस्लिमांमध्ये अनेक विवाह आणि जास्त मुलांमुळे होणारी जलद लोकसंख्या वाढ.
ही असह्य वाढ लक्षात घेवून जेव्हा तेथील हिंदू बाहेरील व्यक्तीच्या आगमनाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी जातात तेव्हा स्थानिक मुस्लिम त्यांना आपले नातेवाईक असल्याचा दावा करतात. अशापकारे मुस्लीम लोक बेकायदेशीररित्या येथे स्थायिक होतात. येथेच जमीन आणि मालमत्ता खरेदी करतात आणि हे बेकायदेशीर अतिक्रमण लक्षात येत असूनही हिंदू देखील स्वतःची जमीन नवीन आलेल्या मुस्लिमांना विकतात. मुस्लिम जमीन खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात.
जर एखाद्या मुस्लिमाकडे खोली किंवा मालमत्ता असेल तर तो ती फक्त मुस्लिमांनाच देईल आणि विशेष भान ठेवून मुस्लिम सतत जमीन मिळविण्याचा प्रयत्न करणार. या विघातक गोष्टी जोपर्यंत तेथील हिंदूंच्या निदर्शनास येणार नाहीत तोपर्यंत हे लोक अनेक मार्गाने असेच अतिक्रमण करत राहतील. मुस्लिमाच्या परिसरात हिंदू उत्सवांमध्ये कोणताही सद्भाव नसतो. एखादे गाव हिंदूबहुल असेल तर व्यत्यय येत नाही, परंतु खैरासारख्या ९०% मुस्लीम असलेल्या सीमेलगतच्या लगतच्या गावांमध्ये हिंदूचे सण ते उघडपणे साजरे करू शकत नाहीत. विचार करण्याजोगी बाब म्हणजे हिंदू बहुसंख्य असलेल्या या देशातील एखाद्या गावात जर हिंदू त्यांचे सण उत्साहाने साजरे करू शकत नसतील तर परिस्थिती अतिशय भयावह आहे.
रिकाम्या जमिनीवर मजार बांधणे आणि ती वर्षानुवर्षे जुनी असल्याचा खोटा दावा करणे
नेपालमधे अनेक भागात मशिदी आणि मदरशांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि याच कारणामुळे मुस्लीमबहुल गावांची संख्या देखील वाढत आहे. अशा मुस्लिमबहुल समुदायांमध्ये हिंदूंना खूप दबावाचा सामना करावा लागतो आणि जेव्हा त्यांना दबाव येतो तेव्हा ते ते क्षेत्र सोडून जातात. एवढेच नाही तर हेच मुस्लीम अशा पळून जाणाऱ्या हिंदूंच्या जमिनी खरेदी करून केवळ श्रीमंत होत नाहीत तर इतर विविध कामांमध्येही गुंतत आहेत आणि हिंदुना वेठीस धरून ठेवत आहेत.
मुस्लिम अति असंवेदनशीलतेने वागत आहेत आणि ते सामाजिक समतोल बिघडवण्याचा देखील प्रयत्न करत आहेत.
नेपाळमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करणारा मुस्लीम वर्ग
भारत आणि नेपाळ यांच्यात खुली सीमा असल्याने लोकांसाठी ये-जा करणं तुलनेने सोपे आहे. याचा गैरफायदा घेऊन अनेक मुस्लीम, काही मुस्लीम संघटनेतील लोक कोणत्याही कागदपत्रांशिवाय किंवा तपासणीशिवाय आत प्रवेश करतात. हिमालयाच्या दुर्गम भागांमध्ये आणि जंगलांमधून अनेक चोरटे मार्ग आहेत, जिथे सुरक्षा रक्षक किंवा तपासणी नसते. अशा मार्गांचा वापर बेकायदेशीर प्रवेशासाठी केला जातो आणि नेपाळमध्ये सहजपणे प्रवेश मिळतो. हा प्रवेश मिळवणे हे त्यांचे पहिले साध्य ठरते.
या टोळधाडी बनावट पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर ओळखपत्रे वापरून प्रवेश मिळवतात. या गोष्टी मुख्यतः आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळ्यांकडून केल्या जातात. एकदा प्रवेश मिळाला कि धर्मांतरण, लव्ह जिहाद, बेकायदेशीर धार्मिक शिक्षण, माजरी बांधणे या सर्व गोष्टी करायला या टोळक्यांना कायमच फोफावते.
गेल्या २० वर्षात देशातील मुस्लीम लोकसंख्या ४% वरून ९ % पर्यंत अर्थात दुपट्टीपेक्षा जास्त वाढण्यासाठी या सर्व घटना कारणीभूत आहेत. किंबहुना यापेक्षा अनेक घटना असतील ज्या प्रकाशात आल्या नसतील, या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणे योग्य ठरणार नाही.
सुरक्षेच्या चिंता: दहशतवादी नेटवर्कचे केंद्र?
भारतीय गुप्तचर संस्थांना भीती आहे की लोकसंख्याशास्त्रीय बदलामुळे भारतात दहशतवादी मार्गांचा विस्तार झाला. नेपाळचा वापर पूर्वी दहशतवादी वित्तपुरवठा करण्यासाठी एक मार्ग म्हणून केला जात होता, पाकिस्तानची इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यासाठी नेपाळमधून निधी पाठवत होती. अहवालांनुसार लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या इस्लामी दहशतवादी गटांनी भारतात घुसखोरी करण्यासाठी नेपाळ सीमेवरील संरक्षणदृष्ट्या कमकुवत जागांचा वापर केला आहे. २०२१ मध्ये नेपाळी व्यावसायिकांनी भारतीय कार्यकर्त्यांना रोख हस्तांतरणाची सुविधा दिल्याचा आरोप आहे, ज्यामुळे सुरक्षा धोक्यात आली आहे आणि हे चक्र असेच सुरू राहणे हिंदूंच्या दृष्टीने धोक्याचे आहे.
कितेक आंतरराष्ट्रीय मुस्लीम संघटना अशा अनेक शक्कली लढवून हिंदुबहुल असलेल्या राष्ट्रांना मुस्लीम राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. ही विघातक शृंखला अशीच चालू राहिली तर काही दशकांनंतर नेपाळ हिंदू अल्पसंख्याक राष्ट्र झाले तर आश्चर्य वाटणार नाही! तसे होण्यापूर्वी नेपाळमध्ये हिंदूराष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. हिंदूची लोकसंख्या , हिंदू संस्कृती या गोष्टी जपणे हा एकमेव मार्ग आहे.