भारतीय नौसेनेच्या चार युद्धनौका लाल समुद्राच्या जवळ तैनात.

0 91

भारतीय नौसेनेच्या चार युद्धनौका लाल समुद्राच्या जवळ तैनात करण्यात आल्या आहेत. ब्राह्मोस गायडेड मिसाईल असलेल्या चारी डिस्ट्रॉयर आणि पोसायडोन टेहेळणी विमान, पाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर अशी मोठी तैनाती अरबी समुद्राच्या उत्तरेला आणि इराणी आखाताच्या जवळ करण्यात आली आहे.भारतीय व्यापारी जहाजांवर सलग दोनदा ड्रोन हल्ले झाल्यानंतर हि मोठी तैनाती करण्यात आली आहे. आधी झालेल्या ड्रोन हल्ल्यांचे फॉरेन्सिक ऑडिट केल्यानंतर गरज वाटल्यास भारतीय नौसेना संबंधित ठिकाणांवर हल्ले करण्याची शक्यताही गृहीत धरली जात आहे.
सध्या येमेन मधील शिया मुस्लिम हौती बंडखोरांनी सुवेझ कालव्यातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर सरसकट हल्ले करायची नीती अवलंबिल्यामुळे कित्येक मोठ्या कंपन्या हजारो किलोमीटरचा वळसा घालून आफ्रिका मार्गे अरबी समुद्रात येत आहेत.

 

https://www.hindustantimes.com/india-news/4-indian-navy-warships-on-high-seas-afterstrike-101703528266384.html

Leave A Reply

Your email address will not be published.