समाजविघातक लोकांनी समर्थ रामदास हे आदिलशहाचे हेर होते, असा शोध लावला आहे. ?
समाजविघातक लोकांनी समर्थ रामदास हे आदिलशहाचे हेर होते, असा शोध लावला आहे…. हा शोध लावला मा.म.देशमुखने!
मा.म.देशमुख कोण होता?
छत्रपती शंभूराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबला सदाचारी म्हणणाऱ्या पिवळ्या पुस्तकाचा लेखक होता.
समर्थ रामदास रायगडाजवळ शिवथरघळ आणि सज्जनगड परिसरात राहत होते, पण ते आदिलशाहचे हेर होते, याचा पत्ता छत्रपती शिवरायांच्या गुप्तहेर खात्याला का लागला नसेल? म्हणजे शिवरायांचे हेर खाते कूचकामी होते असे म्हणायचे आहे का?
स्वराज्याच्या आसपास राहणारे रामदास हे शत्रूचे हेर होते, हे स्वराज्याच्या चोख गुप्तहेरखात्याला माहिती होत नाही, पण 300 वर्षानंतर ही गोष्ट मा.म.देशमुख याना कळते ? तुम्ही कोणाची मापे काढत आहात? शिवरायांच्या गुप्तहेर खात्याची?
सुरतपासून आग्र्यापर्यंत उत्तम कामगिरी करणाऱ्या शिवरायांच्या हेर खात्याच्या कीर्तीला कलंक लावण्याचा हा डाव आहे .
मागील विधानसभा अधिवेशनात आमदार आव्हाड यांनी “गागाभट्टाने महाराजांना पायाच्या अंगठ्याने तिलक लावला” असे विधान केले….तुम्ही कोणाला कमीपणा आणताय ? ज्यांनी चार-चार बलाढ्य जुलमी सत्ता उलथवून टाकल्या त्यांना ? जगात शक्तीशाली असणाऱ्या औरंग्यासमोर त्याच्याच दरबारात सिंहगर्जना करणारे शिवराय असा पायाने टिळा लावून घेतील ?
भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी व्यापक षडयंत्र सुरु आहे. नाशिक येथील आयटी कपंनीतील लव्ह जिहाद, अमरावतीत एका मुस्लिम मुलाने 180 मुलींना जाळ्यात अडकवणे, मागे अनेक सुशिक्षित आणि डॉक्टर असणारे आतंकवादी सापडले. हिंदू मुलींना कन्वर्ट करुन मुसलमान बनवण्यासाठी मोठे नेटवर्क उभे करणारे पकडले .
भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा कोणता आहे ? माहिती आहे ? तो म्हणजे- शिवचरित्र !
जो शिवचरित्र अभ्यासेल, समजून घेईल तो कधीच देशाविरुद्धचे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही.
शिवचरित्र बदनाम करता येत नाही म्हणून त्यात खोट्या कहाण्या घुसवण्यासाठी गोंडस नाव असलेल्या संघटना स्थापन झाल्या,म्हणजे लोकांना शंका येऊ नये.
“शिवाजी कोण होता? ” सारखी पुस्तके लिहून शिवरायांचा लढा धार्मिक नव्हता तर राजकीय होता, अशी खोटी माहिती प्रसूत करण्यात आली.पानसरे यांनी तर “औरंगजेबाने मंदिराला देणग्या दिल्या” असे लिहून त्याला सेक्युलर आणि सॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला.याला कसलाही पुरावा नाही.
गुढीपाडवा, होळी, दसरा वगैरे सण बंद पाडण्यासाठी खोट्या कहाण्या रचून सांगण्यात आल्या.त्यासाठी वारकरी संप्रदायात अनेक कम्युनिस्ट घुसखोर धोतरे नेसून कीर्तन करत आहेत…..हिंदू समाजात फूट पाडत आहेत.यातील अनेकजण राहुल गांधींच्या भारत जोडो (की तोडो) यात्रेत सहभागी होते.
पुतनामावशीची कथा आपल्याला माहिती आहे.बाळकृष्णाला आपल्या दुधातून विष पाजण्यासाठी पुतना सुंदर रुप घेऊन आली होती…. त्याचप्रमाणे हिंदू समाजाला विष पाजण्यासाठी रुपे बदलून अनेक व्यक्ती -संघटनना कार्यरत झाल्या आहेत. जातीजातीत फूट पाडण्यासाठी सामाजिक प्रश्नाचे भांडवल करायचे…. नवनवीन प्यादे उभे करुन समाजात फूट पाडायचा डाव खेळायचा हे उद्योग सुरु आहेत. या नव्या पुतनामावशीचे रुप आम्ही ओळखणार आहोत की नाही ?
छत्रपती संभाजीनगरला विरोध करण्यासाठी 2,73,000 लोकांनी अर्ज केले तरी आम्हाला भाईचारा निभवायचा असतो. कोणी कुठे चहा-पोहे वाटले म्हणून लाखो पूर्वजांचे बलिदान आम्ही कसे विसरुन जातो?
बाजी पासलकर,तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, सूर्याजी काकडे, हंबीरराव मोहिते, हे लोक ज्या इस्लामी शक्तीशी लढले तो फक्त राजकीय लढा होता का? पानसरे कशाच्या आधारावर हे लिहू शकले?
कॉम्रेड गोविंद पानसरे हे कम्युनिस्ट होते…. त्यांच्या इतिहासकारांनी शिवाजी महाराजांना लुटारु आणि चोर संबोधले आहे.त्याविरुद्ध पानसरे कधी बोलले का?
कम्युनिस्ट इतिहासकार इरफान हबीबने लिहिलेल्या The Agrarian system of Mughal India या पुस्तकात मुघलांनी केलेले अत्याचार झाकण्यासाठी असे लिहिले आहे की “शिवाजीच्या किंवा मराठ्यांच्या राज्यातही प्रजा अन्यायमुक्त होती, असं समजण्याचं काही कारण नाही… शिवाजीचं सैन्य कसं होतं, तर Naked starved rascals अर्थात ‘नागडे उपाशी चोरटे’ !”पुढे लिहिलेय “‘लूट नाही, तर वेतन नाही’ , अशी शिवाजीची निती होती. शिवाजीने दख्खनच्या दरिद्री रयतेचा जो काही प्रतिपाळ केला तो असा होता !”
म्हणजे थोडक्यात त्याला असे म्हणायचे आहे की मुघल जसे अत्याचारी होते तसे हिंदू मराठा राज्यकर्ते पण अत्याचारी होते.हीच गोष्ट पानसरेनी वेगळ्या भाषेत लिहिली की जशी मुघलांनी मंदिराची लूट केली तशी हिंदू राजांनीही केली.
मुघल- मराठे सारखेच होते असे शिकवले तर आमच्या भावी पिढीत कसला स्वाभिमान निर्माण होणार आहे? हा स्वाभिमान निर्माण होऊ नये म्हणून औरंगजेबाला सदाचारी ठरवणारी पुस्तके लिहिली जातात, मराठ्यांचा तेजस्वी लढा बोथट करण्यासाठी “शिवाजी कोण होता?” अशी पुस्तके लिहिली जातात.ही पुस्तके वाचून निर्माण होते कणा नसलेली “घर की ना घाट की” निस्तेज तरुणाई!
आम्हाला हिंदुत्वाचा जाज्वल्य अभिमान असणारी, तेजस्वी वारशाची आणि स्वतःचा आणि देशाचा उद्धार करणारी पिढी घडवायची आहे…… त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंह, छत्रपती शंभूराजे, बंदासिंह बैरागी यांचे उदात्त जीवन आमच्यासमोर आहे.
विचार नक्की करा….!!
– रवींद्र सासमकर