अफगाणिस्तान भाग २.

0 519

अफगाणिस्तान भाग २

34 मधील 26 प्रांत असे होते जिकडे एकही गोळी झाडली गेली नाही. इतर ठिकाणी जो गोळीबार झाला त्यातही मृत्यू झाल्या नाहीत! हेरत, मजार-ए-शरीफ, कंदहार, काबुल आणि अशाप्रकारे अफगाणिस्तानच.. अफगाण सैन्याचा एकही सैनिक न मारता केवळ 7 दिवसात तालिबानच्या ताब्यात आले ही एक ‘स्क्रिप्ट’ होती हे मी याआधी सांगितलं. सॅटेलाईट इमेजेस मध्ये तालिबान हातात बंदूका घेऊन येताना दिसत होते आणि अफगाण सैन्य तालिबानी सैनिक येण्याआधीच आपले रणगाडे ‘नीट पार्क करून’ निवांत जीपमध्ये बसून जात असताना दिसत होते (मी फक्त गेल्या आठवड्याभरात झालेल्या घडामोडींबद्दल बोलतोय. त्याआधी दोन्हीकडचे बरेच जवान एकमेकांनी मारले आहेत). संपूर्ण युद्धात एकही अफगाण सेनेचा रणगाडा तालिबानने उडवला नाही हे रेकॉर्डवर आहे! रक्तपात न होता सत्तांतर होण्यात अफगाणिस्तानच्या बाहेरच्या शक्तींचा मोठा रोल होता, हेही आता स्पष्ट होत आहे. तालिबानला संपवण्यासाठी ज्यांच्या 5 राष्ट्राध्यक्षांनी 20 वर्षे घालवली, कित्येक ट्रीलीयन डॉलर्सची बरबादी केली आणि दोन्हीकडच्या हजारो जवानांच्या मृत्यू झाल्या.. त्यानंतर.. त्याच अमेरिकेने सपशेल माघार घेऊन अफगाणिस्तानमध्ये पुन्हा त्याच तालिबानचे राज्य आणले, एवढं सोपं नाही हे! करझाई आणि घनी सारख्या ग्राउंड कनेक्ट नसलेल्या नालायक लोकांना अमेरिकेने वर का आणलं? त्यांची आर्मी तालिबानला दूर ठेवू शकत होती आणि करझाई-घनी सारख्या लोकांमार्फत सरकारवर त्यांचा ताबा होताच. अजून 20 वर्षेही ते राज्य करू शकले असते. मग, आपल्या ताब्यात असलेले एक स्ट्रॅटेजीक राष्ट्र अमेरिका इतक्या सहज तालिबानच्या ताब्यात देईल का? लहान मूलही यावर विश्वास ठेवणार नाही..

★ तालिबान, हक्कानी नेटवर्क आणि इस्लामिक मूव्हमेंट ऑफ उझबेकीस्थान या तीन दहशतवादी संघटनांचे HQ पाकिस्तान मध्ये आहे. तालिबान सत्तेत आल्यावर ते पाकिस्तानला जुमानत नाहीत, हे याआधी जेंव्हा रशिया अफगाणिस्तान मधून निघून गेल्यावर जी 5 वर्षे तालिबानची सत्ता होती तेंव्हा जगाने बघितले आहे. सरळ कोलतात ते! पाकिस्तानचा द्वेष करतात अफगाणी लोकं. त्यांची NE फ्रॉण्टिअर वर वेगळी लफडी आहेत. तेंव्हा पाकिस्तान + तालिबान हा force multiplier नाही, तर येत्या काळात एकमेकांच्या जीवावरच उठणारे ठरणार आहेत. यातही ज्यांना आपण external factors म्हणतो त्यांचा मोठा रोल राहणार आहे. बरेच ट्रायबल टोळीप्रमुख यात मोर्चे उघडू शकतात. जवळजवळ सगळेच सुपारीबाज आहेत..

★ मुल्ला बिरादर ला जेलमधून कोणी काढलं? हा 10 वर्षे जेल मध्ये सडत होता. त्याला अमेरिकेने बाहेर काढलं आणि दोहा मध्ये तालिबानशी समांतर चर्चा सुरू केली. पण का? तर त्याचं कारण होतं..

★ रशिया याकाळात गप्प बसला नव्हता. मॉस्को मध्ये त्यांनी बैठक बोलावली होती ज्यात इराण, चीन, पाकिस्तान, तुर्की आणि भारत शामिल होते. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण या बैठकीला तालिबान ‘विशेष अतिथी’ होते! सगळ्यांना तालिबानचा वापर करण्यात वेगवेगळा इंटरेस्ट होता.. अमेरिकेने दुष्मनी करायची आणि इतरांनी स्वार्थ साधायची संधी मिळताच दोस्ती? अमेरिका मूर्ख नाही..

★ अमेरिकाला तालिबानचा उपयोग इराण विरुद्ध आणि रशियन बॉर्डरवर करता येऊ शकतो. अफगाणिस्तान मधून बाहेर पडल्यावर पाकिस्तानचे लाड करायची अमेरिकेला गरज नाही. जास्त चीनसोबत गुटरगु करतील तर त्यांना औकातीत ठेवता येईल. तेहरिके तालिबान पाकिस्तान (TTP) आणि अफगाण तालिबान मधील ‘केडर’ गरज पडेल त्याप्रमाणे दोन्हीकडे लढत असतात! फक्त बंदुकीच्या नळीची दिशा बदलायची असते यांना..

★ अफगाणिस्तानच्या उत्तरेला 78 किलोमीटर बॉर्डर चीन ला लागून आहे. ईस्टर्न तुर्कीस्तान इस्लामिक मूव्हमेंट चे HQ अफगाणिस्तान मध्ये आहे. हल्लीच काही दिवसांपूर्वी चीनने तालिबानला विनंती केली होती की ETIM ला प्लिज कंट्रोल करा, नाही तर चीनमधील मुल्ले तिकडे प्रॉब्लेम करतील. कदाचित ‘स्क्रिप्ट’ च्या बाहेरची मागणी असल्याने तालिबानने ती सरळ धुडकावून लावली अशी माहिती येत आहे..

★ आता सगळ्यात महत्त्वाचं – पैसा! अफगाणिस्तान ची इकॉनॉमी ड्रग्स वर चालते हे जुनं झालं. ज्यांना ‘new age minerals’ म्हणतात अशा, जगाची नजर असलेला किमान 3-5 ट्रीलीयन डॉलर्स किमतीचा खजिना अफगाणिस्तानच्या जमिनीत आहे! आज भिकेला लागलेला अफगाणिस्तान येत्या काळातील सौदी अरेबिया होऊ शकतो असा खजिना आहे हा. हे अफगाणिस्तान ला माहीत आहे आणि चीन, पाकिस्तानचा त्यावर डोळा आहे हे पण त्यांना माहीत आहे! श्रीमंत आणि स्वबळावर उभा अफगाणिस्तान हा फक्त भारतालाच परवडणारा आहे, हेही त्यांना माहीत आहे..

मग भारताने काय केलं पाहिजे?
आत्तापर्यंत जी भारताची एक linear पॉलिसी होती की आम्ही फक्त जनतेने निवडून दिलेल्या सरकारशीच देणंघेणं ठेवणार, त्याला अन-ऑफिशियली आपण तिलांजली दिली आहेच. म्हणूनच तालिबानशी भारताने चर्चाही केली आणि त्यांनाही भारताशी प्रॉब्लेम नाही. वेट & वॉच, खूप संधी मिळणार आहेत. आपल्या बॉर्डर सुरक्षित ठेवल्या तर नुकसान तर नक्कीच नाही होणार..

सध्या सगळेच देश –

बन्दों से नहीं तोह,
अल्लाह से डरेगी..
बंदूक दिखा दिखा के
क्या प्यार करेगी!!
अफ़ग़ान जलेबी..
घायल है तेरा दीवाना
भाई वाह! भाई वाह!!

– वेद कुमार

धन्यवाद –
अभिजित अय्यर मित्राजी
कर्नल डी.के.सलवान जी।

लेखक हे सामाजिक, राजकीय विषयाचे अभ्यासक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.