सुवेंदूंना पश्चिम बंगालचे ‘अधिकारी’ पद !

सुवेंदूंना पश्चिम बंगालचे ‘अधिकारी’ पद !
पूर्वाश्रमीचे काँग्रेसी पण वैचारिक परिवर्तनानंतर प्रखर हिंदुत्ववादी म्हणून लोकप्रिय झालेल्या आसामचे प्रचंड लोकप्रिय व दबंग नेते हेमंता बिस्वासर्मा यांच्यानंतर प्रतिकुलतेवर मात करणारे दबंग नेतृत्व ही सुवेंदू अधिकारी यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
ममता बॅनर्जी यांच्या क्रूर आणि सुडघेऊ राजकारणाला आव्हान देत लढा देणे सोपे नव्हते. पण अत्यंत टोकाचा संघर्ष करत परिश्रमपूर्वक पश्चिम बंगालच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली, आक्रमक आणि जनाधार असलेले नेते म्हणून सुवेंदू यांनी स्थान प्राप्त केले. 2021 आणि 2026 अशा दोन विधानसभा निवडणुकीत सलग ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्याचा इतिहास सुवेंदू अधिकारी यांनी रचला. ममता बॅनर्जी यांचा अहंकार जिरवणारा नेता म्हणून त्यांची ओळख राष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली.
ममता बॅनर्जी यांचे मुस्लिम धार्जिणे धोरण टोकाचे वाढले होते. मुस्लिमांच्या गठ्ठा मतदानासाठी घुसखुरांना खुले अभय देण्याचे तंत्र ममता बॅनर्जी यांनी वापरले. प्रामुख्याने 24 परगणा भागात बंगाली घुसखोरांना आधार कार्ड वाटून त्यांना मतदान प्रक्रियेत सामावून घेण्याची खुली योजना ममता बॅनर्जी यांनी आखली. अनुनयाचा कळस गाठला. टोकाचा हिंदू द्वेष केला. गुंडांच्या टोळ्या पोसल्या. हिंसाचाराने परिसीमा गाठली. प्रत्येक निवडणुकीनंतर विरोधकांना मारणे, जाळपोळ करणे, लुटणे, बलात्कार करणे अशा घटनांना ममतादीदींचे राजरोस समर्थन असल्याचे चित्र निर्माण झाले होते. ममता दीदींच्या स्टार प्रचारक सायोनी घोष या शिवलिंगावर कंडोम चढवून तो फोटो व्हायरल करतात यावरून ममता बॅनर्जी गॅंग ची विकृत मानसिकता आपल्या निदर्शनास येते. हिंदुत्व च्या विरोधात कंठशोष करणारे नेते अनुनायासाठी कोणत्या थराला जातात याची एकाहून एक सरस उदाहरणे पश्चिम बंगालच्या राजकारणात पाहायला मिळाले. मुस्लिमांचे गठ्ठा मतदान घेण्यासाठी सायोनी घोष तृणमूल काँग्रेसच्या मंचावरून मंचावरून ‘हमारे दिल मे है मदिना, आखो मे है काबा’ हे गीत गात होत्या. हुमायुम कबीर सारख्या कडव्या मुस्लिम नेत्याने बंगालमध्ये पुन्हा एकदा बाबरी मशिद बांधण्याचे दिलेले आव्हान हे ममतांच्या मुस्लिम अनुयायाचेच द्योतक होते.
भाजपाने पूर्वी डाव्यांच्या सरकार विरोधात आणि नंतर ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष केला. क्रमाक्रमाने हिंदुत्वाचे वातावरण तयार व्हायला लागले. ममता बॅनर्जींच्या अतिरेकाला कंटाळलेले सुवेंदू अधिकारी यांच्यासारखे चेहरे भाजपाच्या जवळ येऊ लागले. नुसतेच जवळ आले नाही तर संघर्षासाठी सिद्ध झाले. राष्ट्रीयत्वाची पूर्ण विचारधारा स्वीकारून ममता बॅनर्जी यांच्याशी थेट संघर्ष सुरू केला. हा संघर्ष सोपा नव्हता. अतिशय कठीण होता. पश्चिम बंगाल मध्ये कार्यकर्त्यांचे रक्त सांडले. त्यांच्या परिवारांना त्रास झाला. अनेक महिलांची अब्रू गेली. या संपूर्ण संघर्षाच्या काळात ममतांच्या ठोकशाहीला न घाबरता खंबीरपणे उभे राहणाऱ्या नेत्यांमध्ये सुवेंदू अधिकारी हे नाव अग्रक्रमाने समोर होते. आज भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदासाठी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केली असली तरी हा विजय एकट्या सुवेंदू अधिकारी यांचा नाही. तर तो आजवर झालेल्या संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत देखील आज पहिल्यांदा कमळ फुलले आहे. ज्या भूमीने देशाला हिंदुत्वाचा मंत्र दिला, त्या भूमीत कडव्या हिंदुत्वाच्या आधारावर राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा नवा अध्याय रचण्यासाठी सुवेंदू अधिकारी यांच्या सारख्या कर्मठ नेत्याचीच आवश्यकता होती. तीच लोक इच्छा देखील होती.
56 वर्षीय सुवेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी हे काँग्रेस आणि नंतर तृणमूल काँग्रेसमधील प्रभावी नेते होते. अधिकारी कुटुंबाचा पूर्व मेदिनीपूर भागात मोठा राजकीय प्रभाव राहिला आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल काँग्रेसची स्थापना केली तेव्हा अधिकारी त्यांच्यासोबत गेले आणि पक्षाच्या सुरुवातीच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली.
2007 साली झालेले नंदीग्राम आंदोलन हे सुवेंदू अधिकारी यांच्या राजकीय आयुष्यातील टर्निंग पॉइंट मानले जाते. तत्कालीन डाव्या आघाडी सरकारने नंदीग्राम येथे विशेष आर्थिक क्षेत्रासाठी जमीन अधिग्रहणाचा निर्णय घेतला होता. सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वात या विरोधात मोठे आंदोलन उभे राहिले. ग्रामीण भागातील जनतेला संघटित करणे आणि डाव्या सरकारविरोधात तीव्र वातावरण तयार करणे यामध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरली. नंदीग्राम आंदोलनामुळे पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीविरोधी जनमत मोठ्या प्रमाणावर वाढले आणि पुढे 2011 मध्ये 34 वर्षांच्या डाव्या राजवटीचा अंत होण्यास मदत झाली.
2011 मध्ये तृणमूल काँग्रेस सत्तेत आल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांना राज्यातील महत्त्वाच्या मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली.
2019 लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद वाढू लागले. ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्या मानमानीला कंटाळून सुवेंदू भाजपाकडे वळले. हा बंगालच्या राजकारणातील अत्यंत मोठा राजकीय धक्का मानला गेला. 2021 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातून थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली. अत्यंत चुरशीच्या लढतीत सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. हा निकाल बंगालच्या राजकारणातील मोठा राजकीय क्षण होता.
त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून सुवेंदू अधिकारी यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचार, निवडणुकीनंतरचा हिंसाचार, शिक्षक भरती घोटाळा, हिंदूंवरील अत्याचार आणि कायदा-सुव्यवस्था या मुद्द्यांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेतली. विशेषतः 2021निवडणुकीनंतरचा हिंसाचार आणि शिक्षक भरती घोटाळ्यांवर त्यांनी राज्य सरकारला जोरदार घेरले. अनेक आंदोलने, न्यायालयीन लढाया आणि पत्रकार परिषदांमधून त्यांनी भाजपची भूमिका मांडली. सुवेंदू अधिकारी यांच्या कारकिर्दीत बंगालच्या बदलत्या राजकीय इतिहासाचे प्रतिबिंब दिसते.
सुवेंदू अधिकारी यांचे मुख्यमंत्री पदासाठी निवड झाली त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! मुख्यमंत्री पदाचा मुकुट धारण करण्याच्या काही तास आधी त्यांच्या अतिशय जवळच्या स्वीय सहायकाचा गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला. रक्तरंजित पश्चिम बंगालची वाट बिकट असणार ! यावरून संपूर्ण देशाच्या नजरा बंगालकडे लागल्या आहेत. खूप अपेक्षा आहेत. त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा !
– शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र
#bjp4indla #zalmoori #KhelaHobe #WestBengal #landslidevictory #shivaraykulkarni #ShubenduAdhikari
Comments (0)
Add Comment