मुलींना ठरवून फसवता येते का ?
दुर्दैवाने याचं उत्तर ‘हो’ असंच आहे.
लव जिहाद कसा केला जातो, आजवर किती मुली बळी पडल्या वैगेरे माहितीत रोज भर पडतेच आहे. हा लेख फक्त vulnerable category मध्ये येणाऱ्या मुलींचे आजूबाजूला दिसणारे प्रकार, ती मुलगी अशी का वागते आणि ती तशी वागू नये म्हणून काय करता येईल याबाबत आहे.
बुद्धिजीवी स्त्रियांचे अपवाद सोडले तर बहुतांश स्त्रिया भावनांना प्राधान्य देऊन निर्णय घेत असतात. जेव्हा एखादी हिंदू मुलगी एखाद्या अब्दुल सोबत जाते तेव्हा तिला आईवडिलांबद्दल काहीच कसं वाटलं नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातं. पण लवजिहादला बळी पडून घरवापसी केलेल्या एका मुलीने मुलाखतीत सांगितलं होतं की एक दिवस आईवडिलांना सोडून नवऱ्याकडे जायचंच आहे ही मानसिकता मुलींमध्ये वयात आल्यावर तयार झालेली असते. इथे प्रश्न फक्त त्यांनी अब्दुललाच का निवडलं हा असतो.
एका घरातील सर्व मुलांची जडणघडण आणि समान वातावरणाचा त्यांच्यावर होणारा परिणाम हा समान नसतो, वेगवेगळा असतो. मुलगी प्रॅक्टिकल विचार करणारी असेल किंवा पालक योग्य ते संस्कार देऊ शकत असतील तर काळजी करायची गरजच नसते. पण मुलगी अति स्वप्नाळू, over submissive, ‘self love ’ कोषात पूर्णतः अडकलेली, अति भावनाप्रधान किंवा over ambitious असेल किंवा पालक तिच्यासमोर चुकीच्या गोष्टी glorify करत असतील तर alarming situation लवकरच येऊ शकते.
स्वप्नाळू मुलगी प्रेमाच्या जाळ्यात सहज ओढली जाते कारण या मुलींना प्रेमाचं प्रचंड आकर्षण असतं. त्यांना जे आपण सिनेमात बघतोय किंवा पुस्तकांमध्ये वाचलंय ते सगळं थ्रील, सगळा romance अनुभवायचा असतो. या स्त्रियांना initiative घेणारा, तू हवी आहेस सांगणारा पुरुष खूप आवडतो. त्यांना लाजायचं असतं, मुरडायचं असतं, नको नको म्हणत एक एक पायरी पुढे जायचं असतं. यांच्या स्वप्नातील जगात Optimism bias मुळे ‘माझ्यासोबत काही वाईट होणार नाही’ हा विचार सातत्याने त्यांच्यासोबत असतो जो warning signs दुर्लक्ष करायला भाग पाडतो.
Over Submissive मुलींना बंधनात राहायला आवडतं. स्वतःचा ताबा घेणारा पुरुष त्यांना लगेच हवाहवासा वाटायला लागतो. ‘असे कपडे घाल. हे कर, ते करू नको ’ असं कोणीतरी सांगितलेलं त्यांना जाम आवडतं. Lead घेण्याच्या त्या पुरुषाच्या एका गुणावरून तो successful, attractive, trustworthy आहे असे यांना वाटू लागते. हा Halo effect चा cognitive bias आहे. यात मुली त्या पुरुषाची पहिली छाप कायम लक्षात ठेवतात आणि तीच खरी आहे असे धरून चालतात. या मुली त्या पुरुषाच्या सांगण्यावरून स्वतःचे अर्धनग्न फोटो, video पाठवायला सुद्धा सहज तयार होतात. याचा उपयोग पुढे त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी होऊ शकतो हा स्वप्नातून जागे करणारा वास्तववादी विचारही त्यांना त्यावेळी नको असतो. त्यांच्या आईवडिलांनी जर त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं असेल तर त्या मुली आईवडिलांपासून, कुटुंबापासून आधीच दूर गेलेल्या असतात. त्यामुळे आपल्या मुलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याआधी त्यांना त्याची गरज आहे का हे आधी तपासा. बंधनाचा त्रास होत असेल तरच त्यांना गरजेपूरती conditional सूट द्या. मुलांमुलींवर योग्य ते निर्बंध पूर्वी असायचे. आता ‘my life my rules’, ‘मी माझ्या मुलांना हवं ते करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देणार’ सारख्या घातक विचारांनी ही शिस्त लावण्याची पद्धत मोडीत काढलीय.
Self love नावाच्या कोषात अडकलेल्या मुली वेगळ्याच जगात असतात. यांना कानउघडणी करणारे, हीत अहित सांगणारे मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आई वडील अजिबात नको असतात. त्यांना स्वतःच्या फोटोचं, व्यक्तिमत्वाचं तोंडभरून कौतुक करणारे आजूबाजूला हवे असतात. खोटी स्तुती करण्याची कला अवगत असणारे पुरुष love bombing technique ने यांना सहज पटवू शकतात. आपला धर्म, खानदान, इज्जत याचा विचार दुष्कर्म करताना त्यांच्या मनात फिरकत सुद्धा नाही. स्वतःचे कौतुक करणाऱ्याला या मोठमोठ्या रकमा सुपूर्द करू शकतात, ‘तुला हिजाब शोभून दिसेल’ असं म्हटल्यावर धर्म बदलू शकतात. दुर्दैवाने याप्रकरणातला honeymoon period संपल्यावर यांच्यावरचा कौतुकाचा वर्षाव थांबतो. ‘Gas lighting’ phase सुरू होते. शिव्या आणि लाथा सुरू झालेल्या असतात पण आता जवळची सगळी चांगली लोकं दुरावलेली असतात. यानंतर या मुली शांतपणे victim किंवा पीडिता या भूमिकेत जातात.
अतिभावना प्रधान मुली emotional fool असतात. त्यांना ‘तू कशी आहेस’ हा प्रश्न विचारला तर ‘असं मला कोणीच आजवर विचारलं नव्हतं’ म्हणून भरून येतं. या मुलींना घरी भावनिक आधार मिळाला नाही तर बाहेर त्या कोणाच्याही खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकतात. या सतत nostalgic mode मध्ये असतात. यांना स्वतःचं दुःख कुरवाळत बसायला खूप आवडतं. त्यांचं रडगाणं ऐकून घेणाऱ्यावर त्या जीव ओवाळून टाकतात. ‘तू खूप सहन केलंय. यापुढे तू स्वतःसाठी जगायचं’ हा dialgoue यांच्या आयुष्याचा turning point ठरू शकतो. ‘तू माझ्यासाठी या जगात आली आहेस ’ अशा वाक्यातून त्या कधीच बाहेर पडू शकत नाहीत. पण या मुलींना घरातून कौतुक मिळालं, validation मिळालं आणि आत्मविश्वास वाढला तर मात्र या मुलींची सहज फसवणूक टाळता येऊ शकते. त्यामुळे मुलांच्या छोट्यात छोट्या achievement चं तोंडभरून कौतुक करा. Abraham Maslow यांच्या ‘hierarchy of needs — love & belongingness’ मध्ये कौतुक आणि validation ही मुलांची सर्वात मोठी मानसिक गरज मानली गेली आहे.
या पुढचा प्रकार अवास्तव वाटेल पण काही मुलींना स्त्री-पुरुष संबंधांचं सुप्त आकर्षण अगदी लहानपणापासून असतं. हे पूर्णतः नैसर्गिक आहे. अशा केस मध्ये आई वडिलांनी ‘आम्ही आमच्या मुलींना खूप शिकवणार, तिला लग्न वैगेरे या भानगडीत पडू देणार नाही’ असा पावित्रा घेतला आणि मुलीने कंटाळून आपली बाहेर सोय केली तर चूक कोणाची?
Over ambitious (अतिमहत्वाकांक्षी) मुलींवर चांगले संस्कार करणं, चांगलं वाईट समजावून सांगणं आणि एक ढोबळ roadmap तयार करून देणं खूप महत्वाचं आहे. तिच्यासमोर मैथिली ठाकूर, सुधा मूर्ती, चांद्रयान सोडणाऱ्या साधी राहणी असलेल्या ISRO मधील वैज्ञानिक, ज्यांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती केली त्यांना glorify करायला हवं. त्यांना केवळ पैसा, प्रसिद्धी आणि भौतिक सुख मोठं वाटू लागलं तर त्या वाममार्गाला लागायला फारसा वेळ लागणार नाही.
या सर्व मुलींना control, guilt, secrecy, खोटीस्तुती हे red flags ओळखायला आणि boundaries ठेवायला शिकवणं शक्य आहे. adolescence, Teenage पासून प्रत्येक मुलामुलीला जग स्वतः explore करायला आवडतं. इथून पुढे मुलांना आणि मुलींना घरात जास्तीत जास्त वेळ आणि प्रेम द्यायला हवा. त्यांना उपदेश आणि प्रवचन देऊ नका. काही गोष्टी पालकांच्या आचरणातून ते आपोआप शिकतील. इतर गोष्टींसाठी त्यांना योग्य त्या मूल्यशिक्षण देणाऱ्या संस्थेत/गुरुकुलात पाठवा. ते शक्य नसेल तर मुलांना संघाच्या शाखेत, मुलींना राष्ट्रसेविका समिती मध्ये पाठवा. मुलांना जेव्हा आपण स्वतः घराच्या बाहेरून ज्ञान अर्जित केलं अशी जाणीव होते तेव्हा ते त्याचं अनुसरणही करतात.
आपला धर्म सुंदर आहे, त्याची सौंदर्यस्थाने आपल्या मुलांना आवर्जून दाखवा. जर कार्ल मार्क्सने भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला असता तर ‘Religion is the opium of the people’ (धर्म ही अफूची गोळी आहे) हे विधान त्याने कधीच केलं नसतं. जेव्हा मुली एखादे धार्मिक कार्य करतील तेव्हा त्याचं कौतुक करा. Positive reinforcement चा वापर करा. उपवास, व्रत वैकल्य करत असतील तर त्यांना प्रोत्साहन द्या. ग्रंथ वाचत असतील तर काय वाचलं ते ऐकून त्यांचं कौतुक करा. ‘अध्यात्म, देवदेव या म्हातारपणी करायच्या गोष्टी आहेत, यात वेळ घालवू नको अभ्यास कर ‘असे निर्बुद्धपणाचे सल्ले देऊ नका.
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः।
अधर्माचे प्राबल्य वाढले तर कुलस्त्रिया भ्रष्ट होतात हे अर्जुनाचे शब्द आज रोज नव्याने जाणवत आहेत. या मुलींच्या आयुष्यात धर्माचे प्राबल्य वाढवणे हाच यावरचा एकमेव उपाय आहे. (Image – Shuttersstock.com)
– अश्विनी कुलकर्णी